शिक्षकांनी गुणवत्तापूर्ण शिक्षण देवून, राष्ट्रनिर्माण कार्यात योगदान द्यावे — शिक्षणाधिकारी (प्रा)कलीमोद्दीन शेख


इकबाल मुल्ला
लोहारा/प्रतिनिधी
शिक्षकांनी गुणवत्तापूर्ण शिक्षण देवून,
 राष्ट्रनिर्माण कार्यात योगदान द्यावे,असे प्रतिपादन शिक्षणाधिकारी (प्रा)कलीमोद्दीन शेख यांनी केले.
लोहारा गटशिक्षण कार्यालयाच्या अंतर्गत माकणी केंद्रस्तरीय शिक्षण परिषद सास्तुर येथील निवासी अपंग शाळेत आयोजन करण्यात आले होते.या परिषद समारोप कार्यक्रम प्रसंगी ते बोलत होते.
या शिक्षण परिषदेचे उदघाटन जि.प.सदस्या शितल राहुल पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रमेश भुरे होते.तर प्रमुख म्हणुन डी.ऑय.इ.सी.पी.डी.चे जेष्ठ अधिव्याख्याता इब्राहिम नदाफ,पं.स.सदस्य बसवराज शिंदे(उमरगा), शिक्षण विस्तार अधिकारी घोलप,सी.एस.जाधव, शांतेश्वर विद्यालयाचे मुख्याध्यापक के.एल.चव्हाण, शरद पवार हायस्कूल मुख्याध्यापक डी.के.देशमुख (राजेगाव),शालेय शिक्षण समितीचे अध्यक्ष पवार (होळी),माकणी केंद्रातील विषय साधनव्यक्ती अनंत लहाने,आदी उपस्थिती होते.याप्रसंगी भरीव लोकसहभाग मिळवून होळी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचा कायापालट करण्यासाठी योगदान दिल्याबद्दल शालेय समितीचे अध्यक्ष पवार यांचा जि.प.सदस्या शितलताई पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.या शिक्षण परिषदेमध्ये अध्ययनस्तर, निती आयोग,दिक्षा अॅप्,नवोपक्रम व कृतीसंशोधन या विषयावर उपस्थित शिक्षकांना सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.या कार्यक्रमाचे प्रास्ताविक माकणी केंद्राचे केंद्रप्रमुख एम.जी.वाघमोडे व सुञसंचलन सास्तूर निवासी अपंग शाळेचे मुख्याध्यापक बी.टी. नादरगे यांनी केले.ही परिषदेच्या यशस्वीे करण्यासाठी केंद्र प्रमुख एम.जी.वाघमोडे व विषयसाधनव्यक्ती अनंत लहाने यांच्या मार्गदर्शनाखाली सास्तूर निवासी अपंग शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी
परीश्रम घेतले.या कार्यक्रमास शिक्षक व मुख्याध्यापक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

SHARE THIS

Author: