इकबाल मुल्ला
लोहारा/प्रतिनिधी :- औसा तालुक्यातील दापेगाव येथील इमॅन्युएल पब्लीक स्कुलच्या अध्यक्षा डॉ.जयश्री चौघुले यांना नुकताच आंतरराष्ट्रीय कार्यक्रमात राष्ट्रीय पुरस्काराने कर्नाटक राज्यातील सिमोगा येथील नेहरु इन्डोर स्टेडियम येथे आयोजित दुसऱ्या आंतरराष्ट्रीय प्युपिल्स ऑलिम्पिक स्पर्धा २०१८,ता.१८(शनिवार)रोजी झालेल्या कार्याक्रमात डॉ.चौघुले यांना 'पीओए नॅशनल अॅवार्ड-२०१८'चा वैद्यकीय व शैक्षणिक क्षेत्रातील योगदानाबद्ल मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत पुरस्काराने गौरविण्यात आले होते.त्यांच्या या यशाबद्ल प्रशालेने सत्कार सोहळा आयोजित कार्यक्रमात लातूरच्या महात्मा बसवेश्वर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.श्रीकांत गायकवाड यांच्या उपस्थितीत त्यांचा भव्य सत्कार करण्यात आला.या वेळी प्युपिल्स ऑलंपिक असोसिएशनचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रा.डॉ.महेश मोटे,सरचिटणीस महमंदरफी शेख,दिलीप चौघुले,प्राचार्या के.के.पाटील आदींच्या उपस्थितीत सन्मानचिन्ह,गौरवपत्र देवून सन्मानित करण्यात आले.या वेळी प्रशालेतून सहभागी झालेल्या खेळाडूंचा यथोचित सत्कार करण्यात आला.