ग्रामदैवत कपिलेश्वर मंदिर श्रावणमास निमित्य पुराण सोहळा 1972 पासून सोहळा होतोय संपन्न...


इकबाल मुल्ला
लोहारा प्रतिनिधी :- उमरगा तालुक्यातील मुरूम येथील कपिलेश्वर मंदिरात दि.13 ऑगस्ट पासून पुराण कथा सुरू आहे.या पुराण कथेतील प्रसंगानुरूप आयोजकांनी शुक्रवार (दि 24) रोजी सांयकाळी धनगर समाजाच्या एका गरीब कुटुंबातील मुला मुलीचे विवाह लावून देत समाजासमोर नवा आदर्श घालून दिला आहे.
  श्रावणमासा निमित्त येथील हनुमान चौकातील कपिलेश्वर मंदिरात पुराण कथेचे आयोजन करण्यात आले आहे.दररोज सांयकाळी 5 ते 7 या वेळेत गदग येथील प्रसिद्ध पुराणिक पंडितरत्न विश्वनाथ शास्त्री हे आपल्या अमृत वाणीने "कलबुर्गी श्री शरणबसप्पा" पुराण कथा सांगत आहेत.या पुराण कथेतील श्री शरणबसप्पा आणि यांच्या विवाह प्रसंगानुसार आयोजकांनी मुरूम येथील एका गरीब कुटुंबातील मुला मुलीचे विवाह लावून दिले.


शुक्रवारी सांयकाळी वाजता पुराण कथेसाठी तयार करण्यात आलेल्या मंडपातच मुरूम येथील श्री म्हाळाप्पा निंगप्पा सोटक्के यांचा मुलगा व जिडगा येथील श्री लक्ष्मण बेळे यांची मुलगी यांचा अक्षता सोहळा पार पडला.या वेळी यांच्या विशेष उपस्थितीसह भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.यावेळी आयोजकांच्या वतीने भाविकांसाठी तसेच मुला मुलीकडील पाहुणे मंडळींसाठी भोजनाची ही व्यवस्था करण्यात आली होती.सामाजिक बांधिलकी जपत आयोजकांनी या धार्मिक कार्यक्रमातच धनगर समाजाच्या मुला मुलीचे लग्न लावून त्या गरीब कुटुंबाला आधार देत समाजासमोर एक नवा आदर्श घालून दिला आहे. या विवाह सोहळास हजारो ग्रामस्थ उपस्थित होते. बसव पुराण निमित्य दररोज दासोह (महाप्रसाद) चे आयोजन करण्यात आले असून दि.08.09.2018 ला सांगता होणार आहे.
जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष तथा कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती बापूराव माधवराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गेले अनेक वर्षांपासून मंदिर समिती अध्यक्ष शिवराज पाटील,प्रशांत पाटील,धनराज हळे, गुरप्पा भोसगे,वैजीनाथ लादे,संतोष ढंगे,प्रभाकर लामजाने,विश्वनाथ लादे,चंद्रकांत खुणे,राजकुमार विभूते,यांच्यासह ग्रामस्थ परिश्रम घेऊन वर्षानुवर्षे सोहळा उत्साहात पार पाडत आहेत.

SHARE THIS

Author:

Previous Post
Next Post