लोहारा/प्रतिनिधी :- लोहारा शहरातील शंकरराव जावळे पाटील महाविद्यालयाच्या जलवसंवर्धन व जलव्यवस्थापणासाठी विशेष श्रमसंस्कार शिबीरास लोहारा तालुक्यातील मोघा बु येथे सुरुवात करण्यात आली.
या कार्यक्रमाचे उदघाटन लोहाऱ्यांच्या नगराध्यक्षा सौ.ज्योती दीपक मूळे यांच्या हस्ते करण्यात आले.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष दिनकरराव जावळे पाटील होते. तर प्रमुख म्हणुन उपनगराध्यक्ष प्रताप घोडके, विनोद जावळे पाटील, सरपंच सौ.शिल्पा पाटील, दिपक मुळे, नितीन जाधव, अंकुश नारायणकर, श्रीकांत पाटील, अदि उपस्थित होते. यावेळी दीपक मुळे यांनी पाण्याचे महत्त्व लोकांना पटवून सांगितले. त्यांनी आधुनिक पद्धतीने जलसंवर्धन करणे हे भविष्यकाळासाठी गरजेचे आहे असे प्रतिपादन केले.
हे शिबीर सात दिवस चालणार असून यात जलसंधारणाचे कामे केली जाणार असून विवीध उपक्रम राबविण्यात येणार आहेत. रक्तदान, आरोग्य तपासणी, पशुचिकित्सा शिबिर, अंधश्रद्धा निर्मूलन, तसेच विविध क्षेत्रातील तज्ञांचे मार्गदर्शन लाभणार आहे. या कार्यक्रमास रासेयो कार्यक्रमाधिकारी प्रा.डॉ. एल.सोमवंशी, प्रा.डी.कोटरंगे, यांच्यासह महाविद्यालयातील प्राध्यापक व कर्मचारी, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.