कै.मोतीराम लांडगे यांच्या प्रथम वर्षश्राद्धानिमित्त शालेय साहित्य वाटप


इकबाल मुल्ला
लोहारा/प्रतिनिधी :- उस्मानाबाद तालुक्यातील टाकळी (बें) येथे दि.28 डिसेंबर रोजी राजर्षी शाहू विद्यालयात एकंबीवाडी (ता.औसा) येथील कै.मोतीराम सदाशिव लांडगे यांच्या प्रथम वर्षश्राध्दानिमित्त उस्मानाबाद येथील बिल गेट्स महाविद्यालयाचे प्रा. सोमनाथ लांडगे यांच्या स्वखर्चातून विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करण्यात आले.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अध्यक्ष तानाजी गायकवाड होते. तर प्रमुख म्हणून तुळजाई शिक्षण प्रसारक मंडळाचे उपाध्यक्ष भारत सोनटक्के, सचिव काकासाहेब पाटील, संचालक प्रताप गायकवाड, रमेश सुर्यवंशी, मनोहर चौरे, शाळेचे मुख्याध्यापक पंडीत इंगळे, संचालक प्रताप गायकवाड, रमेश सुर्यवंशी, गोरे सर, करवते सर, मनोहर चौरे, घाडगे सर, अदि उपस्थित होते.

  यावेळी प्रा.सोमनाथ लांडगे यांनी प्रस्ताविक  करताना म्हणाले की, हे युग स्पर्धेचे आहे, सर्व विद्यार्थ्यांनी या युवगात टिकण्यासाठी  चिकाटीने, मेहनतीने अभ्यास करणे अत्यंत आवश्यक आहे, विध्यार्थ्यांनी स्पर्धात्मक परीक्षेची तयारी कशी करावी, स्पर्धा परीक्षेला कसे सामोरे जावे ? या बाबत त्यांनी अनमोल असे मार्गदर्शन केले. यावेळी  सचिव काकासाहेब पाटील यांनी विध्यार्थ्यांना सविस्तर   मार्गदर्शन केले. या कार्यक्रमास संचालक प्रताप गायकवाड, रमेश सुर्यवंशी, मनोहर चौरे, मुख्याध्यापक पंडीत इंगळे, गोरे सर, घाडगे सर,  करवते, यांच्यासह शिक्षक,विद्यार्थी,नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रशांत सोनटक्के यांनी केले. तर आभार सहशिक्षक आर.सी.कांबळे यांनी मानले.

SHARE THIS

Author:

Previous Post
Next Post