उमरखेड :- विधान सभा मतदार संघात होणाऱ्या निवडणुकीत स्थानिक पातळीवरिल तसेच विधान सभा व लोकसभेची निवडणुक ई व्ही एम मशिन व्दारे न घेता बॅलेट पेपर च व्दारे घेण्याची मागणी समाजवादी पार्टीच्या वतीने उपविभागीय अधिकारी कापड निस यांचे मार्फत मुख्य निवडणुक आयोग नवी दिल्ली यांना ३१जुलै रोजी देण्यात आले
राज्यात व देशात गेल्या निवडणुकीत ई व्ही एम मशिन व्दारे घेण्यात आलेल्या निवडणुकीत या मशिन मध्ये गडबड झाल्याचे प्रकरण निदर्शनास आले . या पुर्वी बॅलेट पेपर व्दारे मतदान होत होते तेंव्हा कुठल्याही प्रकारची गडबड दिसुन येत नव्हती त्यामुळे निवडणुक पारदर्शक पध्दतीने होत होत्या त्यामुळे समाजवादी पार्टी ने देशात व राज्यात ई व्ही एम मशिन बंद करून बॅलेट पेपरवर मतदान घेण्यात यावे अशी मागणी केली आहे यांचा प्रत्यय म्हणुनच उमरखेड येथे या संदर्भात प्रशासनाला निवेदन सादर केले या वेळी पक्षाचे राज्य कार्यकारणी सदस्य चुन्नुमीयाँ काझी , शहर अध्यक्ष शे निसार ,डॉ आंबेजोगाईकर , शायद इकबाल, साहेब खाँ , महमद आरिफ खाँन ,ईलीयास राज , शे जमीर आणि दत्ता सिं नगाने , सतिष हिंगडे , सतिष कोल्हे हे उपस्थित होते