छावा गणेश मंडळ राबवित आहे सामाजिक उपक्रम


उमरखेड :- शहरातील शिवाजी वार्डातील छावा गणेश मंडळाच्या वतीने विविध नाविन्यपूर्ण सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले असून मंडळाच्या या उपक्रमास शहरातील नागरिकांचा प्रतिसाद मिळत आहे .

   शहरातील शिवाजी वार्डातील युवकांच्या पुढाकारातून   सन २००० साली स्थापन करण्यात आलेल्या छावा गणेश मंडळाने आपल्या नाविन्यपूर्ण विविध सामाजिक उपक्रमामुळे शहरात लौकीक मिळविला असून यंदाच्या गणेशोत्सवात या मंडळाच्या वतीने श्रीच्या आगमना पासून ते निरोप समारंभ पर्यन्त दररोज स्वच्छता मोहिम, रांगोळी स्पर्धा ,

गीत गायन व नृत्य स्पर्धा , किर्तन , प्रबोधनात्मक व्याख्यानमाला , तसेच भारतिय सैनिकांच्या सन्मानार्थ रक्तदान शिबीर अशा विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन केले आहे . नगराध्यक्ष नामदेव ससाणे यांच्या उपस्थितीत या मंडळाचे अध्यक्ष गणेश गव्हाणे, उपाध्यक्ष अतुल भालेराव , सचिव सुनिल शहाणे , कोषाध्यक्ष अक्षय सुरोशे , कार्याध्यक्ष प्रसाद गव्हाणे , अशोक बोलजवार , सुनिल शहाणे , मारोती दुधेवार .आदिंनी सहभागी होऊन  शनिवारी शहरात स्वच्छता मोहीम राबविली होती .

SHARE THIS

Author:

Previous Post
Next Post