मोकाट जनावरांमूळे ट्रकचा अपघात



तालूका प्रतिनिधी / उमरखेड :- नागपूर - बोरी - तूळजापूर हा राष्ट्रीय महामार्ग उमरखेड शहरातून जातो या मार्गावर गेल्या काही महिन्यापासून मोकाट जनावरांचा मूक्त संचार वाढला असून किरकोळ अपघात नित्याचीच बाब बनली आहे . दि . २३ सोमवारी सकाळी येथील पंचायत समिती जवळ  सकाळी ५ : ३० वाजता रस्त्यावर ठाण मांडून बसलेल्या मोकाट जनावरांमूळे ट्रक पलटी झाल्याची घटना घडली आहे .
मागील सहा महिन्यात शहरात सर्वत्र मोकाट जनावरे , कुत्रे , वराह  यांचा मूक्त संचार आहे . याबाबत दै . लोकशाही वार्ता ने वेळोवेळी बातम्या सूध्दा प्रकाशित केलेल्या आहेत . पण निगरगठ्ठ झालेल्या प्रशासनाला जाग कधी येणार ? देव जाणे . पण या मोकाट जनावरांमूळे वाहनधारकांना मात्र त्रास सहन करावा लागत आहे . नगर परिषद प्रशासनाकडून माहीती घेतली असता मोकाट जनावरे पकडण्याचे कंत्राट घेण्यासाठी कोणी समोर येत नाही असे समजले . विशेष म्हणजे मोकाट जनावरे पकडले तर ते ठेवणार कूठे ? असा प्रश्न सध्या पालिकेकडे उभा आहे . कारण एक कोंडवाडा होता तो मच्छी मार्केटला दिल्याने या जनावरांचा प्रश्न एरणीवर आला आहे .
काल झालेल्या अपघातात ट्रक कमांक एम एच २६ बी इ ६७१४ हा नरेश शिराळे यांच्या मालकिचा असून वणी येथून दगडी कोळसा भरून नांदेड येथे जात होता . उमरखेड शहरात पंचायत समिती जवळ सकाळी ५ : ३० च्या दरम्यान रस्त्यावर ठाण मांडून बसलेल्या जनावरांना वाचविण्याच्या नादात सदर ट्रक रस्त्याच्या कडेला असलेल्या लिबाच्या झाडावर आदळून पलटी झाला . सूदैवाने यामध्ये कोणतीही जीवीत हाणी झाली नाही . पण चालक आणि क्लीनर ला किरकोळ जखम झाली असल्याचे चालक योगेश लवाटे यांनी प्रस्तुत प्रातिनिधी सोबत बोलताना सांगीतले .

SHARE THIS

Author:

Previous Post
Next Post