उमरखेड : - प्रेषित हजरत मुहम्मद यांची जयंती.ईद ए मिलादुन्नबी इस्लाम तिथीप्रमाणे २१ नोहेंबर रोजी उमरखेड शहरात उत्साहात साजरी करण्यात आली .
सकाळी ८ वाजताचे सुमारास जुलूस तातर शहा दर्गा येथून निघून रोहिलीपुरा, शिवाजी वार्ड ,ताजपुरा वार्ड,मैलांली चौक, नागचौक,गायत्री चौक, गांधी चौक,खडकपूर,स्वामींच्या मठा समोरून,तीन देऊळ ,अबरार चौक ते परत दर्गा येथे फतेहा खाणी करण्यात आली जुलूस मध्ये विविध सामाजिक संघटना,औदुंबर वृक्ष समिती,आटो युनियन, प्लम्बर संघटना,रजा एकॅडमी, एकता परिषद अश्या अनेक संघटना सहभागी होऊन जुलूस चे स्वागत केले कोणी फुल देऊन स्वागत केले तर कोणी बिस्कीट,खिचडी,शरबत, पाणी बॉटल देऊन स्वागत केले.
या वेळेस काँग्रेस,राष्ट्रवादी , एमआयएम , भाजपा सह अनेक पक्षांचे नेते व कार्यकर्ते उपस्थित होते .
जुलूस पाहण्यासाठी हजारोंच्या संख्येने गावा गावातून नागरिक उपस्थीत होते . या दरम्यान पोलीस निरीक्षक गायकवाड यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता ईद ए मिलादुन्नबी कमिटी १७ -१८चे अध्यक्ष अब्दुल समद अब्दुल सलाम यांनी आपल्या कार्यकर्त्या संघ सर्व सामाजिक संघटना ,सर्व पक्षीय नेते,पोलीस प्रशासन व नागरिक यांचे आभार मानले विशेष करून पोलीस प्रशासन चे आभार मानले