Showing posts with label राजनीति. Show all posts
Showing posts with label राजनीति. Show all posts
BJP को झटका! जिला परिषद चुनाव में कांग्रेस ने दी शिकस्त; गडकरी के गांव में भी हारी पार्टी

BJP को झटका! जिला परिषद चुनाव में कांग्रेस ने दी शिकस्त; गडकरी के गांव में भी हारी पार्टी



नागपुर :- केंद्रीय मंत्री नितिन गडकरी के गृह गांव धापेवाड़ा में भी बीजेपी को हार का मुंह देखना पड़ा है। यहां से कांग्रेस उम्मीदवार को जीत मिली है। 31 सीटों के साथ कांग्रेस सबसे बड़ी पार्टी बनकर उभरी है।

महाराष्ट्र के नागपुर जिला परिषद के चुनाव में बीजेपी को तगड़ा झटका लगा है। यहां 58 में से 31 सीटों पर जीत हासिल कर कांग्रेस सिंगल लार्जेस्ट पार्टी बनकर उभरी है। दिलचस्प बात यह है कि बीजेपी को नागपुर में भी हार का सामना करना पड़ा है, जहां बीजेपी आमतौर मजबूत मानी जाती है। यही नहीं केंद्रीय मंत्री नितिन गडकरी के गांव में भी पार्टी को हार का मुंह देखना पड़ा है।

जिला परिषद चुनाव में कांग्रेस आगे बता दें कि बीजेपी से अलग होने के बाद शिवसेना ने कांग्रेस और एनसीपी संग सरकार बनाई है। ऐसे में अभी बीजेपी इस झटके से उबर भी नहीं पाई थी कि अब पार्टी को आरएसएस के गढ़ नागपुर में जिला परिषद चुनाव में हार का सामना करना पड़ा है। यहां कांग्रेस 31 सीटों के साथ सबसे बड़ी पार्टी बनकर उभरी है। गौरतलब है कि केंद्रीय मंत्री नितिन गडकरी और पूर्व सीएम देवेंद्र फडणवीस दोनों ही नागपुर इलाके से आते हैं। ऐसे में यहां मिली हार से बीजेपी का विपक्ष के निशाने पर आना तय है।

जिला परिषद चुनाव: बताया जा रहा है कि अब तक के नतीजों के मुताबिक, 58 में से 31 सीटों पर कांग्रेस ने जीत हासिल की है। जबकि बीजेपी के पास सिर्फ 14 सीटें आईं हैं। एनसीपी को 10, शिवसेना को 1 और अन्य को 2 सीटों पर जीत मिली है।

गडकरी के गांव में भी हारी बीजेपी: गौरतलब है कि जिला परिषद चुनाव में गडकरी के गांव धपेवाड़ा में कांग्रेस उम्मीदवार महेंद्र डोंगरे को जीत मिली है। जहां महेंद्र डोंगरे को 9,444 वोट मिले, तो वहीं बीजेपी प्रत्याशी को महज 5,501 वोट ही हासिल हुए। बता दें कि धापेवाड़ा सीट तीन बार से बीजेपी के ही कब्जे में थी। लेकिन इस बार कांग्रेस ने यह सीट कब्ज़ा ली है।
दिग्गज नेते असलेल्या नागपुरातच भाजपाचा पराभव झाला -जयंत पाटील

दिग्गज नेते असलेल्या नागपुरातच भाजपाचा पराभव झाला -जयंत पाटील


जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची पकड असलेल्या नागपूरमध्येच भाजपाला धक्का बसला आहे. नागपूर जिल्हा परिषद निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादीनं विजय संपादन करत भाजपाच्या बालेकिल्ल्यालाच हादरा दिला आहे. “निवडणूक टाळणाऱ्या भाजपाचा जनतेने पराभव केला. दिग्गज नेते असलेल्या नागपुरातच भाजपाचा पराभव झाला आहे,” अशी प्रतिक्रिया राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी निकालानंतर व्यक्त केली.

नागपूर जिल्हा परिषदेचे निकाल बुधवारी जाहीर झाले. मतदारांनी काँग्रेस-राष्ट्रवादीला निवडत भाजपाच्या विरोधात कौल दिला आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरींच्या मूळ गावातही भाजपाला पराभवाला सामोरं जावं लागले आहे. येथे काँग्रेस उमेदवार विजयी झाला आहे.

नागपूर जिल्हा परिषदेच्या निकालानंतर जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी भाजपाला चिमटे काढले आहेत. “राष्ट्रवादी काँग्रेस आणि मित्र पक्षांना जिल्हा परिषद निवडणुकीत चांगले यश मिळाले आहे. नागपूर जिल्हा परिषद निवडणूक वारंवार पुढे ढकलली जात होती. भाजपा निवडणूक टाळत होती. मात्र, आज निवडणूक झाली. जनतेनं राष्ट्रवादी काँग्रेस आणि मित्र पक्षांच्या पारड्यात आपले मत टाकले. विदर्भात भाजपाचा आज पराभव झाला आहे. ज्या नागपुरात भाजपाचे दिग्गज नेते आहेत. जिथे भाजपाची चांगली पकड होती. त्याच नागपुरात भाजपाचा पराभव झाला आहे,” अशी टोला पाटील यांनी लगावला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस आणि मित्र पक्षांना जिल्हा परिषद निवडणुकीत चांगले यश मिळाले आहे. नागपूर जिल्हा परिषद निवडणूक वारंवार पुढे ढकलली जात होती. भाजप निवडणुकीला टाळत होती मात्र आज निवडणूक झाली. जनतेने राष्ट्रवादी काँग्रेस आणि मित्र पक्षांच्या पारड्यात आपले मत टाकले आहे.

नागपूर जिल्हा परिषदेच्या ५८ आणि १३ पंचायत समितीच्या ११६ जागांसाठी जिल्ह्यात मंगळवारी मतदान झाले. ६७ टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. बुधवारी मतमोजणीला सुरूवात झाल्यानंतर भाजपाला धक्का बसणार असल्याचे कल येण्यास सुरू झाले. दुपारपर्यंत चित्र स्पष्ट झालं. दुपारपर्यंत हाती आलेल्या निकालानुसार भाजपाने सहा जागांवर विजय मिळवला, तर काँग्रेसने १२ आणि राष्ट्रवादीने सहा जागांवर विजय मिळवला आहे. शिवसेना आणि शेकपाने प्रत्येकी एका जागेवर विजय मिळवला आहे.
गरीब वस्तीत जाऊन आजी-माजी आमदारांनी साजरा केला रक्षाबंधन

गरीब वस्तीत जाऊन आजी-माजी आमदारांनी साजरा केला रक्षाबंधन


अथर खान 
मुर्तीजापुर प्रतिनिधी :- दरवर्षीप्रमाणे येथील आमदार हरीश पिंपळे आणि पूर्व माजी आमदार तुकाराम बिडकर यांनी गरीब वस्तीत जाऊन गरीब बहिणीच्या हातून राखी बांधून घेत रक्षाबंधन कार्यक्रम साजरा करून या बहिणींच्या आनंदात भर घातली त्यांचा आनंद द्विगुणित केला गेल्या 14 वर्षापासून आमदार तुकाराम बिडकर व आमदार हरीश पिंपळे यांनी मतदारसंघातील जुन्या वस्तीतील लकडगंज भागात गरीब वस्तीत जाऊन गोरगरीब बहिणींच्या असते राखी बांधून रक्षाबंधन साजरा करण्याचा कार्यक्रम केला जातो आहे कुठलेही काम असले तरी वेळात वेळ काढून या गरीब बहिणींकडे येऊन ते रक्षाबंधन साजरे करतात तसेच त्यांच्या समस्या देखील ऐकून घेतात यावेळी वैजंताबाई विश्वनाथ डोंगरदिवे यांच्या घरी रक्षाबंधनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता यावेळी आमदार हरीश पिंपळे यांनी माजी आमदार तुकाराम बिडकर सामाजिक कार्यकर्ते कमलाकर गावंडे एडवोकेट पाहून पांडे एडवोकेट चंद्रजित देशमुख सुनिल पवार कैलास महाजन कोमल तायडे निखिल ठाकरे अमोल शिंदे नितीन ताले आदींची यावेळी उपस्थिती होती या कार्यक्रमाचे संचालन गजानन बेलखेड यांनी केले गोरगरीब आणि समाजापासून दूर असलेल्या असलेल्या सोबत रक्षाबंधन साजरा करून समाजाला संदेश देण्याचे काम या कार्यक्रमाच्या माध्यमातून आजी-माजी आमदार करीत असल्याचे म्हटले जात आहे.


ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन तर्फे महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2019 साठी  इच्छुक उमेदवारी अर्ज वितरण कार्यक्रमास सुरवात

ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन तर्फे महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2019 साठी इच्छुक उमेदवारी अर्ज वितरण कार्यक्रमास सुरवात


औरंगाबाद : महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2019 साठी ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन तर्फे निवडणूक लढविण्यास इच्छुक असलेल्या उमेदवारांसाठी
अर्ज वितरित करणे तसेच जमा करणे संबंधी कार्यक्रम घोषित करण्यात आले आहे.

    तरी अर्ज मा.प्रदेश अध्यक्ष यांचे कार्यालय औरंगाबाद तसेच मा.सर्व विभागीय अध्यक्ष व सर्व जिल्हा अध्यक्ष यांच्या कार्यालयात उपलब्ध आहे. हे अर्ज भरण्याची अंतिम तारीख 10 ऑगस्ट पर्यंत आहे व हे अर्ज जे इच्छुक उमेदवार भरतील त्यांची मुलाखाती साठी कार्यक्रमाची तारीख कळविली जाईल.
महाकाल सेनाचे मोठया उत्साहात शाखेचे उदघाटन

महाकाल सेनाचे मोठया उत्साहात शाखेचे उदघाटन


मुर्तिजापुर :- आज दिनांक 21/7/2019 रविवार रोजी शाखा क्रमांक 12 नाका नंबर 7 सिरसो,मूर्तिजापूर येथे महाकाल सेनाचे मोठ्या उत्साहात शाखेचे उद्घाटन करण्यात आले. त्यावेळी महाकाल सेना संस्थापक/अध्यक्ष लखनभैया मिलांदे संघटन उपाध्यक्ष हिराभैय्या दुबे सचिव पराग भगत शहरअध्यक्ष आशिषदादा साबळे तालुकाध्यक्ष प्रतिक जाधव उपतालुका अध्यक्ष प्रतिक मुळे उपशहाराध्यक्ष कुणाल जयस्वाल महाकाल सेना संघटना सदस्य कुणाल सुतवणे  महेश सायगन आकाश सायगन उमेश तिवारी आणि सर्व महाकाल सेना शाखाप्रमुख, पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. महाकाल सेना संस्थापक / अध्यक्ष लखनभैया मिलांदे व समस्त महाकाल सेना पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्या साक्षीने शाखा क्रमांक 12 नाका नंबर 7 येथील शाखाअध्यक्ष हर्षल ठोकळ उपशाखाध्यक्ष आकाश इंदुरकर सचिव क्षितिज खरबडकर व समस्त सदस्यांनी पदग्रहण केले.
शाखा उद्घाटनाच्या वेळेस लखन भैया मिलांदे यांनी सर्व पदाधिकाऱ्यांना शुभेच्छा दिल्या व महाकाल सेना चे कार्य व महत्त्व सर्वांना सांगितले शहराध्यक्ष आशिष साबळे यांनी सर्व महाकाल सेनाच्या कार्यकर्त्यांना सामाजिक काम करण्यासाठी प्रोत्साहित केले.कार्यक्रमाचे सूत्र संचालन अतुल इंगोले पाटील यांनी केले.