ताहिर मिर्ज़ा.
उमरखेड़ :- नितीनभाऊ भुतडा मित्र मंडळाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या गौरी गणपती सजावट स्पर्धेच्या विजेत्यांची नावे जाहीर करून त्यांना बक्षीस वितरनाचा कार्यक्रम आज 7 ऑक्टोबर रोजी येथील राजस्थाणी भवन मध्ये पार पडला असून सदर कार्यक्रमास जिल्हा पोलीस अधीक्षक एम राजकुमार उपस्थित होते
विविध सामाजिक कार्यात सदा अग्रेसर राहणारे नितीन भुतडा यांच्या नावाने चालणार्या सामाजिक संघटनेने नितीनभाऊ भुतडा मित्र मंडळाच्या वतींने यावर्षी प्रथमच आपल्या सर्वांच्या घरी स्थापन होणाऱ्या महालक्ष्मी व घरगुती गणपती आणि सार्वजनिक नोंदणीकृत गणेश मंडळाच्या सजावट स्पर्धेचे आयोजन केले होते या स्पर्ध्रेत बेटी बचाओ बेटी पाढाओ स्वच्छता वृक्षारोपण प्लास्टिक बंदी पर्यावरण रक्षण अश्या अनेक विषयांवर स्पर्धकांनी आकर्षक सजावट केली होती याच स्पर्धेचा निकाल जाहीर करून विजेत्यांना व सहभाग धारकांना उत्तेजनार्थ बक्षीस वितरणाचा कार्यक्रम येथील राजस्थाणी भवन येथे सकाळी 11 वाजता आयोजित करण्यात आला होता
या कार्यक्रमास जिल्हा पोलिस अधीक्षक एम राजकुमार उमरखेड नगराध्यक्ष नामदेव ससाणे माजी आमदार विजय खडसे प्रकाश पाटील देवसरकर नगर परिषद मुख्याधिकारी गणेश चव्हाण उपाध्यक्ष अरविंद भोयर नगरसेवक प्रकाश दुधेवार मंचावर उपस्थित होते या कार्यक्रमास शहरातील सर्व सामाजिक ,राजकीय संघटनेचे पदाधिकारी पत्रकार मित्र तसेच सर्व स्पर्धकांनी उपस्थित होते यावेळी महागौरी स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक शीलाताई लासीनकर द्वितीय दिलीप शहाणे तर तृतीय सीमा ठाकरे यांनी पटकाविला असून घरगुती गणेश स्पर्धेमध्ये प्रथम अभिनव कोमलवार द्वितीय साई दुर्केवार तर तृतीय युवराज अग्रवाल यांनी मिळविला तसेच सार्वजनिक नोंदणीकृत गनेश मंडळामध्ये प्रथम क्रमांक राजस्थाणी युवा गणेश मंडळ द्वितीय सिद्धेश्वर गणेश मंडळ तर तृतीय क्रमांक नगर परिषद कर्मचारी गणेश मंडळांनी पटकाविला सर्व विजेत्यांना आकर्षक बक्षिसांसह सन्मानचिन्हाने सन्मानित करण्यात आले उल्लेखनीय बाब म्हणजे सर्व स्पर्धकांना उत्तेजनार्थ बक्षिसाने मान्यवारांच्या हस्ते सन्मानित करन्यात आले यावेळी सर्व उपस्थितांचे नितीनभाऊ भुतडा मित्र मंडळाने आभार व्यक्त केले