- सकल मराठा मोर्चाच्या महाराष्ट्र बंदला उमरखेड चा उत्स्फूर्त प्रतिसाद
ताहिर मिर्ज़ा
उमरखेड :- सकल मराठा मोर्चाच्या वतीने मराठा आरक्षणासाठी सुरु असलेल्या आंदोलनात सोमवारी काकासाहेब शिंदे (वय २८) या तरुणाने गंगापूर तालुक्यातील कायगाव टोक येथे पुलावरील गोदावरी नदीच्या पात्रात उडी मारली. यात काकासाहेब शिंदे याचा मृत्यू झाला. काकासाहेब शिंदेच्या मृत्यूच्या पार्श्वभूमीवर मराठा संघटनांनी आज महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे.याला उमरखेड वासियांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद देत उमरखेड 100% कडकडीत बंद पाळला आहे.
यावेळी उमरखेड मध्येही मराठा आरक्षणासाठी सुरु असलेल्या आंदोलनाचे पडसाद उमटले, शिवाजी चौक, गांधी गांधी चौक,स्व.नारायणराव पाटिल मार्केट,ढाणकी रोड,महागाव रोड,खडकपुरा आणि पुसद रोडवरिल सर्व दुकाने सकल मराठा समाजाचे आंदोलक रस्त्याने फिरत असताना " काकासाहेब शिंदे अमर रहे, अमर रहे " अशा घोषणा देत असताना स्थानिक व्यापाऱ्यांनी स्वयंपुर्ती ने आपली प्रतिष्ठाने बंद करून महाराष्ट्र बंदला उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला.
संपूर्ण शहरातून मोर्चा काढल्यानंतर येथिल शिवाजी महाराज चौकामध्ये सर्वांनी एकत्र येऊन काकासाहेब शिंदे यांना श्रद्धांजली अर्पण केली. या महाराष्ट्र बंद च्या मोर्चामध्ये शहरातील व ग्रामीण भागातील मोठ्या प्रमाणात युवक महिला व जेष्ठ सहभागी झाले होते यावेळी उमरखेड पोलिस स्टेशनचे ठाणेदार हनुमंत गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली उमरखेड शहरात तगडा बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
25 जुलै रोजी सकल मराठा मोर्चा
सकल मराठा मोर्चाच्या वतीने उद्या दिनांक 25 जुलै रोज बुधवार रोजी उमरखेड येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मैदाना मधून मराठा आरक्षणाकरिता सकल मराठा मोर्चाच्या वतीने महामोर्चा काढण्यात येणार असून सकल मराठा समाज बांधवांनी मोर्चात हजर राहण्याचे आवाहन सकल मराठा मोर्चा समिती उमरखेड च्या वतीने करण्यात आले आहे.

