- सकल मातंग समाजाचे एसडीओंना निवेदन
उमरखेड :- दिल्ली येथे भारतिय संविधानाच्या प्रती जाळणाऱ्या समाजकंटकांविरुद्ध तात्काळ गुन्हे दाखल करून त्यांच्याविरुद्ध कठोर कार्यवाही करावी अशा आशयाचे निवेदन सकल मातंग समाज उमरखेड यांच्या वतीने उपविभागीय अधिकाऱ्यांना देण्यात आले आहे .
दिल्ली येथील जंतर मंतर या ठिकाणी समाजकंटकांनी भारतिय संविधानाच्या प्रती जाळून भारतरत्न डॉ , बाबासाहेब आंबेडकर यांच्या बाबत आक्षेपार्ह घोषणा दिल्या .
भारतिय लोकशाहीचा आत्मा असणाऱ्या संविधानाच्या प्रती जाळून महामानवाचा अवमान करणाऱ्या देशद्रोही समाजकंटकांविरुद्ध तात्काळ गुन्हे दाखल करून कठोर शासन करावे अशी मागणी सकल मातंग समाजाच्या वतीने उमरखेडचे नगराध्यक्ष नामदेव ससाणे , व्ही .एच . हनवते, डी. एस . ससाणे , दत्तात्रय काळे , राजू गायकवाड , गोविंद इंगोले , शेवंतराव गायकवाड , सारनाथ रोकडे , रामदास काळे , दामोदर इंगोले , देवानंद इंगोले , संतोष जळके , प्रशांत ससाणे , अतुल खंदारे , जय बनसोड , गजानन काचेवाड , युवराज बंडगर , गजानन लामटिळे, सतिष लामटिळे आदिंनी उमरखेड उपविभागीय अधिकाऱ्यांना दिले .
