उमरखेड : - तालुक्यात शहरी व ग्रामीण भागामध्ये दिनांक 24 सप्टेंबर 2018 ते 9 ऑक्टोबर 2018 या कालावधीत माननीय प्रधानमंत्री प्रगती योजना अंतर्गत कृष्ठरोग शोध अभियान राबविण्यात येत आहे . सदर मोहिमेत मध्ये काम करणाऱ्या आशा स्वयंसेविका व पुरुष स्वयंसेवक यांना प्राथमिक आरोग्य केंद्र स्तरावर एक दिवसाची कृष्ठरोग विषयक प्रशिक्षण देण्यात आलेले आहे असुन त्यांचे मार्फत घरोघरी भेटी व कृष्ठरोग बाबतची माहिती देऊन प्रत्येक घरातील सर्व सदस्यांची तपासणी करण्यात येत आहे . या अभियानामध्ये आढळलेल्या सर्व संशयित रुग्णांची तपासणी तालुक्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्र व कुटिर रुग्णालयात केली जाणार असून वेळीच औषधोपचार केले जाणार आहे . तालुक्यात मागील पाच वर्षांमध्ये बहुविध औषधोपचारामुळे 191 रुग्ण कृष्ठरोग मुक्त झाले आहे. करीता तालुक्यातील शहरी व ग्रामीण भागातील सर्व जनतेने अभियान कालावधीत घरी येणाऱ्या चमुस सहकार्य करून तपासणी करून घ्यावी व कृष्ठरोग निर्मुलन कार्यास योगदान द्यावे. असे आवाहन तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर ढगे व वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर मांडण यांनी केले आहे.
उमरखेड तालुक्यात कुष्ठरोग शोध मोहीम