मतदान केंद्रनिहाय इव्हीएम व व्हीव्ही पॅटचे प्रशिक्षण २६ डिसेंबरपासुन


उमरखेड (ताहिर मिर्ज़ा) :-  अगामी लोकसभा आणी विधानसभा निवडणुकीत व्हीव्ही पॅट असलेल्या इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्राचा वापर करण्यात येणार आहे . या मशिनबाबत नागरिकांच्या मनात असलेल्या शंका दुर करण्याच्या उद्देशाने उपविभागीय अधिकारी तथा सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयामार्फत नगर परिषद मॅरेज हॉल येथे ईव्हीएम , व्हीव्ही पॅट जनजागृती अभियान प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात आला . या प्रशिक्षणाला तालुक्यातील सरपंच , पोलीस पाटील , ग्रामसेवक , कृषिसेवक , अंगवाडी सेवीका , तलाठी व सर्व मंडळ अधिकारी उपास्थित होते . सदर प्रशिक्षण घेतलेल्या अधिकारी व कर्मच्या ऱ्यांमार्फत २६ डिसेंबरपासून तालुक्यातील संपुर्ण मतदान केंद्रनिहाय प्रात्याक्षिक करून नागरीकांच्या मनातील शंका दुर करण्यात येतील . यावेळी उपविभागीय अधिकारी स्वप्नील कापडणीस , तहसिलदार भगवान कांबळे , नायब तहसीलदार आर .के. कुऱ्हाडे , मार्गदर्शक एस .एम. वाघमारे आदि उपस्थित होते . मार्गदर्शन करतांना उपविभागीय अधिकारी म्हणाले , ईव्हीएम आणी व्हीव्ही पॅटबाबत उपस्थित सर्वांनी घेतलेले प्रशिक्षण प्रत्येक मतदान केंद्रापर्यंत जावून द्यायचे आहे . त्यासाठी गावात दवंडी पिटून नागरीकांना प्रशिक्षणाबाबत अवगत करावे .

SHARE THIS

Author:

Previous Post
Next Post