​मंजुळ पावा​

​मंजुळ पावा​
रणरणती दुपार
मरगळलेल मन
अजब मनाचे गजब खेळ
टाळायची कशी भयाण वेळ
बापूडपण आलेल
सरता सरत नाही
खदखदणारी खंत
कोप-यात जावून मरत नाही
बे भरवशाच जगण
एकटच स्फुंदून स्फुंदून रडतं
दाखव म्हणत जगून
आवर्जून सांगत
ताजतवान व्हायला
बदलते मग हवा
वाहू लागतो विचार
हवेसोबत विचार नवा
स्वागताला सरसावताना
पेटवून घेतो एक
प्रकाश दिवा
उजेडाचा
काजवा असला तरी तो
माझाच असतो
त्याच्याच उबेवर मी जगतो
दुपार संध्याकाळ
निघून जाते
दमदार  दिवसाची
नवी सकाळ
घुमवते मग
मंजुळ  पावा

तुकाराम पाटील
पिंपरी पुणे १७

SHARE THIS

Author:

Previous Post
Next Post