पहिला पाऊस



ढग गरजले
विज चमकली
पहिल्या पावसाची
पहिली सर धावत आली

पाऊस जोरात आला
मी धावत गेलो
चिंब चिंब भीजलो
पावसांच्या सरींना
कवेत घेता घेता
खाली पडलो

मंग ति आली
तीने हात दिला
तिचा हात धरून
मी ऊभा राहीलो
तिने कवेत घेतले
घट्ट मिठी मारली
पावसात भिजतांना
तिने मुकाही घेतला

ती घरात घेऊन गेली
दार बंद केले
साडीच्या पदराने डोकं पुसले
ओले कपडेही तिनेच काढले
तेव्हढ्यात......
विज कडाडली
मी तिच्या कुशीत शिरलो

पावसाच्या ढगाळ वातावरणात
तिच्या सोबतचं जेवलो
मगं तिच्या मांडीवर
डोक ठेऊन झोपलो
ती डोक्यावरून हात फिरवीत
गाण म्हणु लागली
मंग मी खुप ऊशीरा
झोपेतुन उठल्यावर
 तिला विचारले

आई पाऊस गेला का गं !

संजय धनगव्हाळ

SHARE THIS

Author:

Previous Post
Next Post