वाजली नाही तरी ती खावयाची
दार आहे वाजणारे उघडताना
साद नाही ओळखीच्या पावलांची
लाभलेले भाग्य माझे थोर आहे
पाहतो मी रोज लंका रावणाची
दोन वेळा खायचेही आज वांदे
थोरवी मी काय सांगू गौरवाची
वाजणारे थांबवा रे ढोल ताशे
मानहानी होत आहे दैवतांची
भेटली ती काल होती आज नाही
रात गेली बात गेली गौरवाची
मागताना भीक याना लाज नाही
कोडगी ही जात आहे माणसाची
बदललेले सर्व काही ठीक नाही
पायमल्ली होत आहे भावनांची
तुकाराम पाटील
चिंचवड पुणे ३३