दोन कुळाची मालकी
लेक जपते सासरी
राजबिंड्या भ्रताराची
बने लाडकी अस्तुरी
लाडाकोडाचे माहेर
हळूहळू विसरते
मग संसार रथाचे
दुजे चाक ती बनते
हिंदोळते मन ध्यान
पेलताना जड भार
जग रहाटी जपून
नित्य फुलवी संसार
नाही शिणवटा कधी
नाही कसल मागणं
कळा घराची सांगते
तिचे साजरे अंगण
जपताना देह कुडी
शेला घेई पांघरूण
सासरच्या नात्या साठी
मन टाकी अंथरूण
नातीगोती सांभाळता
तिची उलघाल होते
मग पावलो पावली
तिचे बहरते नातो
वंश वाढता वाढता
मोल जगण्याला येते
उभा पेलता प्रपंच
बळ रितेरिते होते
बाई हिरकणी साठी
शोभे सोन्याचे कोंदण
जीवपल्याड जपते
लाख मोलाच गोंदण
तुकाराम पाटील
चिंचवड पुणे ३३