![]() |
जाहिरात
झाला फकीर आता
जगणे जगावयाला
सांगून काल आला
त्याच्याच आरशाला
जगणे जगावयाला
सांगून काल आला
त्याच्याच आरशाला
होतो कलंदराचा
मोठाच बोलबाला
भाकीत छान झाले
होतेच बारशाला
मोठाच बोलबाला
भाकीत छान झाले
होतेच बारशाला
वाळू मुठीत धरली
सगळी गळून गेली
झोळी आहेच पक्की
खांद्यास बांधलेली
सगळी गळून गेली
झोळी आहेच पक्की
खांद्यास बांधलेली
दिवसास शोधणा-या
रात्री ब-याच आल्या
जळती मशाल बघता
सा-या पळून गेल्या
रात्री ब-याच आल्या
जळती मशाल बघता
सा-या पळून गेल्या
वा-यावरी कसा हा
वेडा आरूढ झाला
फिरण्यास लाभल्या की
दाही दिशा तयाला
वेडा आरूढ झाला
फिरण्यास लाभल्या की
दाही दिशा तयाला
हा चालतो तरी ही
धरणी वरी सुखानी
तक्रार नोंद केली
त्याच्याच आसवानी
धरणी वरी सुखानी
तक्रार नोंद केली
त्याच्याच आसवानी
जगण्या वरील श्रद्धा
त्याची अभंग होती
ही वाटली जगाला
मोठी अमोघ क्रांती
त्याची अभंग होती
ही वाटली जगाला
मोठी अमोघ क्रांती
तुकाराम पाटील
पिंपरी पुणे १७
जाहिरात
