माणसाने संत होऊ नये झालाच तर लाजीरवान अंत करू नये


लोकांना ज्ञान सांगुन स्वता मोठ व्हायचं 
आणि आपल्या अज्ञानाच वेड जगाला लावायचं
ज्ञान वाटुनच धनीक श्रीमंत व्हायच तरिही
कुटुंबाची जबाबदारी घ्या म्हणून 
जगाला रडुन सांगायचं

अरे ऊघड्यावर पडलीत
शेतकऱ्याचे कुटंब त्यांच काय
याची चिंता कोणी करत नाही
रोज त्यांच मरण असतं
पण आधार कुणाचा ते घेत नाही
दुःख यातना गरिबी याचं संपत्तीत ते जगत असतात
संघर्ष करुन स्वबळावर ते आयुष्याशी लढत असतात

आता संत होणे नाही
संत तर तेव्हाच होऊन गेले
जे भजन किर्तनातच रंगले
स्वताच कुटुंब देशोधडीला लाऊन
जगाचं कल्याण करुन गेले
म्हणून देव स्वता येऊन
त्यांना घेऊन गेले
नाही कोणी त्यांचे पुतळे उभे केले
नाही त्यांचे कुठे फोटो दिसतातं
आजही त्याच्या आठवणीत
फक्त दिंड्याच निघतातं

अरे जगं सार नैराश्यातच आहे
कुणाच्याच चेहऱ्यावर 
हाश्य नाही 
तरिही... माणुस जगतो आहे
संकटाशी खेळणारा खरा लढवय्या माणुस
डाव अर्ध्यावर मोडुन या जगातुन पळ काढीत नाही

संजय धनगव्हाळ

SHARE THIS

Author:

Previous Post
Next Post