नको शोधुस तु मला चांदण्यारात्री
मी तुला दिसणार नाही
कारण मी आता अंधारात विसावलोय
आभाळातून तुला बघतायावं म्हणुन पोर्णिमेला तुझ्या घरावरनं जायला सांगितले पण तिथे अमावस्या आडवी आली
मि तुझी वाट बघतं असतांना तुझ्या हातावर मेहंदी लागतेय कळले
तेंव्हा मी तुला भेटायला यायला निघालो
तरं वाटेत यम आडवा आला
मग काय देह माझा स्मशानात जळत होता तेंव्हा
तुझ्या हातावरची मेहंदी रंगत होती
आणि माझ्या अस्ती विसर्जनाच्या दिवशी
तु नव्या जोडीदाराच्या गळ्यात हार टाकत होती
कळल जेंव्हा तुला मी या जगात नाही
तेंव्हा तु नव्या घरात नव्या जोडीदारा सोबत स्वप्न घेऊन नव्या आयुष्याला सुरवात केली होती
तेंव्हा नको शोधुस तु मला चांदण्यारात्री
मी तुला दिसणार नाही
कारण मी आता अंधारात विसावलोय
संजय धनगव्हाळ