बाबा तुम्ही नसतात तेव्हा

जाहिरात

बाबा तुंम्ही नसतात तेंव्हा
आठवण तुमची येत असते
तुम्ही असल्यावर खुप मजा असते

तुम्हीच मला शाळेत
पोहचवण्याचा माझा हट्ट असतो
खाऊसाठी माझा नेहमीचं आग्रह
असतो
रोज रोज नवीन नवीन चाँकलेट
मला तुमच्या कडुन मिळते
चाँकलेट घेतल्यावर
हात तुमचा सोडुन
आईच्या कुशीत माझी घट्ट मिठी असते

बाबा तुम्ही खुप खुप काम करतात
दमलात तरी नेहमीच आनंदात आसतात
असेल अडचण कितीही
तरी ईच्छा मात्र पुर्ण करतातं
सणासुधीला गोडधोड
नवे कपडे न विसरता अणतातं

खरचं बाबा म्हणजेना
हळवा माणुस
प्रत्येक वेळी गरत बाबांचीच लागते
बाबांशिवाय काहीच होत नसते
दुःख लपवून सुःख देणार बाबांच मनं असते
बाबा म्हणजे घरातलं एक
मोठ विश्व असते

बाबा म्हणजे नेमकं काय
कुणाला काही कळतं नाही
बाबांच्या आयुष्यात कुणाचचं
मन वळतं नाही
तरीही बाबा पाठीवर हात ठेऊन
पुढेचं पाठवतात
आयुष्याच्या कशीद्यावरती
स्वप्न सुखाचे रंगवतात

बाबा म्हणजे घरातले घरपण
असते
बाबांशीवाय जगणे कधीचं
नसते

संजय धनगव्हाळ
जाहिरात

SHARE THIS

Author:

Previous Post
Next Post