दगडाला देवपण देणारा माणुस



घाव घालुन दगडाला
 देवपण देणाऱ्या माणसाच्या आयुष्यात
असतात वेदना आणि दुःख
दारिद्र्य आणि गरीबी

पोटाची खळगी भरण्यासाठी
हा उघड्यावर घर मांडत असतो
उन्हातान्हात दगड कोरून
 देव घडवत असतो

घाव घालून धाव त्याची जघण्यासाठीच असते
साऱ्या जगाकडे बघणाऱ्या 
त्या देवाच मात्र त्याच्याकडे
दुर्लक्ष असते

घाम गाळुन भुक विसरून
ते दगडातच देव बघतो
दगडाचा देव विकत घेणारा माणुस
त्या देवाची पैशाने बोली लावत असतो

त्या घडवलेल्या देवाला
माणुस सोण्याचा साज चढवतो
पण देव घडवणाऱ्या माणसाला
त्याच्या कष्टाचा दामही मिळतं नसतो

त्या दगडाच्या देवाला किती मोठे मंदिर असते
दगडातुन देव निर्माण करणाऱ्याला साधी झोपडी सुद्धा नसते
देवापुढे नमणारे देवाच्या क्रूपेने
श्रीमंत होतात
देव त्यांच भलं करतो
दगडाला देवपण देणारा माणुस मात्र दुःख दारिद्र्य गरिबी घेऊन
जगण्यासाठी नविन गाव शोधतं असतो

संजय धनगव्हाळ

SHARE THIS

Author:

Previous Post
Next Post