आयुष्य तिचं आणि त्याचं (पती पत्नी याच्यासाढी)



रोज रोज भांडण तिचं
खुप प्रेमळ असतं
तिच्या रागावण्यातही
खर प्रेम दिसतं

दिवसभर काम करुनही
ति कधीच थकतं नाही
त्याची काळजी घेतल्या शिवाय
घास पोटातं जात नाही

सुखं म्हणजे काय
तिला माहीतच नसते
तो घरी आल्याशिवाय
ती दिवा लावत नसते

आजारपण तिचं ती
आनंदातचं घालवते
दारात ऊभी राहुन ती
वाट त्याची पहात असते

कसलीच अपेक्षा ती
कधी करतच नाही
घर परिवाराशिवाय तिला
दुसर काही माहीतच नाही

नको म्हटलं तरी ती
राग त्याच्यावरचं काढते
प्रदक्षिणा तिची पोर्णिमेला
त्याच्यासाठीचं असते

त्याला विचारल्या शिवाय ती
काहीच करत नाही
राग रुसवा असला तरी
एकमेंशिवाय रहात नाही

तिच जगण म्हणजे
त्याच आयुष्य असते
त्याच्या साठीचं तर
तिचे जगणे असते

खर तरं आयुष्य तिच
आणि त्याचचं असतं
नटखट असल भाडंण तरी
घर दोघांच्या आधाराने ऊभ असतं

संजय धनगव्हाळ

SHARE THIS

Author:

Previous Post
Next Post