जगण्याला कंटाळुन मरतो रोजं शेतकरी


जगण्याला कंटाळुन
मरतो रोजं शेतकरी
आणि पुसले जातात
कितीतरी कपाळाचे कुंकू
पोरका होतो संसार
अनाथ होतातं मुलं
भविष्याच्या अंधारात
त्यानंतर.....!
असंख्य वेदना मुकं जखमा
आणि कधी न सुटणाऱ्या
र्निदोष प्रश्रांच ओझं ओढतांना
जगायचं असत तिला
विधवा होऊन
एका माणसाच्या मरणाने
कुकंवाच्या भारातुन
कपाळ मोकळे होते
पण शेतीमाती तशीचं भारं
घेऊन पडुन असते
स्वताला दोष देतं
किती सोपं वाटतं मरण
म्हणुनं बांधुन घेतो फास
पण मरताना कधीच
विचार करतं नाही
राहून गेलेल्या त्या जिवीतं
आतम्यांचा
घरात रडण्याचा काहोर असतो
आणि प्रश्र पडतो त्या
सुकलेल्या मातीला ईथे
कोण चुकलं पाऊस की माणुसं
मुडंन करुन माणुस मेल्याचं
सुतकं तर फेडले जाते
पण माती तशीचं पडुन रहाते
सुतकातं वर्षानुवर्षे
माणुस जगण्यातुन मुक्त होतो पण....
अमानुष शिक्षा भोगणाऱ्या
त्या शेतीमातीला कुठल्याचं
कर्जातुन मुक्त होता येतं नाही
​संजय धनगव्हाळ​

SHARE THIS

Author:

Previous Post
Next Post