भाजपाच्या महामेळाव्यास पत्रकारांनी उपस्थित रहावे — भाजप प्रदेश सरचिटणीस आ़.सुजितसिंह ठाकूर




  • उस्मानाबाद भाजप मिडिया विभाग जिल्हा बैठकीस चांगला प्रतिसाद

इकबाल मुल्ला
लोहारा/प्रतिनिधी :- भारतीय जनता पार्टीच्या स्थापनादिनानिमित्त मुंबई येथे दि.6 एप्रिल रोजी ऐतिहासिक महामेळावा होणार आहे़.या मेळाव्यास भाजप राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा,पंतप्रधान नरेंद्र मोदी,राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस,यांच्यासह अनेक नेते मार्गदर्शन करणार आहेत़.या मेळाव्यास भाजपा मीडिया विभागाच्या पदाधिकाऱ्यांसह पत्रकारांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे,असे आवाहन भाजपाचे प्रदेश सरचिटणीस,आ़. सुजितसिंह ठाकूर यांनी केले़.
 महाभाजपा-महामेळाव्याच्या पार्श्वभूमीवर भाजपा मीडिया विभागाची उस्मानाबाद शहरातील शासकीय विश्रामगृहात दि.30 मार्च रोजी बैठक घेण्यात आली. या बैठकीत आ़.सुजितसिंह ठाकूर बोलत होते़.यावेळी  भाजप जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी,प्रदेश कार्यकारिणी सदस्य सुधीर पाटील,ॲड़ अनिल काळे, रूपामाता उद्योग समूहाचे अध्यक्ष ॲड़ व्यंकटराव गुंड, एसपी शुगरचे चेअरमन सुरेश पाटील, वसंतदादा बँकेचे चेअरमन विजय दंडनाईक,ॲड़.नितीन भोसले, जि.प सदस्य ज्ञानदेव राजगुरू आदींची प्रमुख उपस्थित होती़.यावेळी आ.सुजितसिंह ठाकुर पुढे बोलताना म्हणाले कि,राज्यात मुंबईसारखी मोठी महानगरपालिका असलेली जिल्हे सोडल्यास उस्मानाबाद जिल्ह्यातील भाजपाचा मीडिया विभाग सर्वात सक्षम आणि कार्यक्षम आहे़.मीडिया विभाग हाच आता भाजपाचा कान,नाक,डोळा आणि आवाज आहे़.शासनाच्या विविध कल्याणकारी योजना तळागळापर्यंत पोहचविण्याचे काम मीडिया विभाग करत आहे़. भाजपाच्या ऐतिहासिक,विराट महामेळाव्यास पत्रकार मोठ्या संख्येने येणार असल्याचे मिडिया विभागाचे जिल्हा अध्यक्ष धनंजय रणदिवे यांनी सांगितले़.1  पत्रकार 1 लाख लोकांपर्यंत बातमी पोहचविण्याचे काम करतो़.त्यामुळे जिल्ह्यातील पत्रकारांनी मोठ्या संख्येने या महामेळाव्यास मोठ्या संख्येने उपस्थित रहावे,असे आवाहनही आ़.सुजितसिंह ठाकूर यांनी केले़.यावेळी मिडिया विभाग सरचिटणीस मिलिंद कुलकर्णी,जीवन गायकवाड,पार्श्वनाथ बाळापुरे,राहुल कोरे,उपाध्यक्ष ओंकार कुलकर्णी,भगवान बांगर,संजय  खुरूद,दत्ता गायके,मिडिया विभाग चिटणीस अनंत तापडीय,नागेश इंगळे,मिडिया विभाग कोषाध्यक्ष हेमंत कुलकर्णी,सहप्रसिध्दीप्रमुख पांडूरंग(अण्णा) पवार,मिडिया विभाग तालुकाध्यक्ष सुभाष कदम (उस्मानाबाद),मिडिया विभाग तालुका अध्यक्ष इक्बाल मुल्ला (लोहारा),यांच्यासह भाजप मिडिया विभागातील पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.या बैठकीचे प्रास्ताविक भाजप मिडिया विभाग  जिल्हाध्यक्ष धनंजय रणदिवे यांनी केले तर आभार प्रसिध्दीप्रमुख पांडूरंग(अण्णा) पवार यांनी मानले़.

SHARE THIS

Author:

Previous Post
Next Post