इकबाल मुल्ला
लोहारा/प्रतिनिधी :- लोहारा येथील न्यू व्हिजन इंग्लिश स्कुलला शिवसेना युवा नेते किरण गायकवाड यांनी दि.2 एफ्रिल रोजी सदिच्छा भेट दिली. याप्रसंगी स्कुलतर्फे संस्थेचे सचिव तथा प्राचार्य शहाजी जाधव यांनी स्मृतिचिन्ह देऊन सत्कार केला.याप्रसंगी स्कुलमधील शिक्षक,कर्मचारी व विद्यार्थ्यांसोबत चर्चा व संवाद साधला.स्कुलच्या दर्जेदार व गुणवत्तापूर्ण शिक्षणाबद्दल समाधान व्यक्त करून लोहारा तालुक्यातील अनेक खेडेगावातून येथे सर्वसामान्यांची मुले येऊन अतिशय माफक फिसमध्ये उत्तम शिक्षण घेत असून त्यांना चांगल्या भौतिक सुविधाही देण्यासाठी सूचना केल्या.तसेच स्कुलच्या भविष्यातील यशस्वी वाटचालीसाठी मनापासून शुभेच्छा दिल्या.यावेळी जिल्हा मराठी पत्रकार संघटना लोहारा तालुका अध्यक्ष इकबाल मुल्ला, सामाजिक कार्यकर्ते व पालक श्रीकांत भरारे, विजयकुमार ढगे,राष्ट्रवादी काँग्रेस लोहारा शहराध्यक्ष आयुब शेख,माजी सैनिक राजेंद्र सूर्यवंशी,शिवराज झिंगाडे,सुदर्शन भारती,गणेश सूर्यवंशी,बालाजी बिराजदार,सिद्धेश्वर सुरवसे,हारून हेड्डे,अदि उपस्थित होते.
