नाशिक: CMच्या कार्यक्रमावर मीडियाचा बहिष्कार


नाशिक :- नाशिकमध्ये आज झालेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शेतकऱ्यांसोबतच्या भेटीच्या कार्यक्रमावर स्थानिक पत्रकारांनी बहिष्कार घातला. पोलिसांनी केलेली अडवणूक व काही प्रतिनिधींशी केलेल्या अरेरावीमुळं पत्रकारांनी हा निर्णय घेतला.

नाशिकमधील सह्याद्री फार्म हाउसवर फडणवीस यांच्या शेतकाऱ्यांसोबत भेटीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. हा कार्यक्रम कव्हर करण्यासाठी आलेल्या प्रिंट आणि इलेक्ट्रोनिक मीडियाच्या प्रतिनिधींना आमंत्रित करण्यात आले होते. परंतु ग्रामीण पोलिसांनी पत्रकारांना वार्ताकंन करण्यास मज्जाव केला. तसंच, प्रतिनिधींशी अरेरावी केली.

मुख्यमंत्र्यांच्या सुरक्षेला धोका असल्याचे सांगत पत्रकारांचे व्हिडिओ चित्रीकरणही केलं. त्यामुळं पोलीस आणि पत्रकारांमध्ये वादावादी झाली. पोलिसांनी पत्रकाराशी प्रवेशद्वारावरच हुज्जत घातली. आमदार आणि अधिकाऱ्यांनी मध्यस्थी करूनही पोलीस अधीक्षकांची अरेरावी कायम राहिली. त्यामुळं पत्रकारांनी मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला.


SHARE THIS

Author:

Previous Post
Next Post