इकबाल मुल्ला
लोहारा/प्रतिनिधी :- आपल्या मुलांसाठी पैसा व धन न कमावता त्यांना कमावण्यालायक बनवा असे प्रतिपादन प्राचार्य नागसेन कांबळे यांनी केले. लोहारा शहरातील न्यू व्हिजन इंग्लिश स्कुलमधील पाल्यांच्या पालकांसाठी " पालक मार्गदर्शन शिबीर " व " शिक्षक कार्यशाळा " दिनांक 29 मार्च रोजी शहरातील सप्तरंग मंगल कार्यालयात घेण्यात आला.
या प्रसंगी ते बोलत होते.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी लोहारा येथील केंद्रप्रमुख मनोहर वाघमोडे होते.तर प्रमुख वक्ते म्हणून बीड जिल्यातील फिनिक्स इंटरनॅशनल इंग्लिश स्कुल आष्टीचे(जि.बिड) संस्थापक,प्राचार्य नागसेन धर्मराज कांबळे,सौ.सीमा कांबळे,स्कुलचे प्राचार्य शहाजी जाधव,संचालिका सौ. सविता जाधव,पालक प्रतिनिधी डॉ.प्रा.रामेश्वर धप्पाधुळे,डॉ.हेमंत श्रीगिरे,जिल्हा मराठी पत्रकार संघटना तालुका अध्यक्ष इकबाल मुल्ला,आदी उपस्थित होते.यावेळी सर्वप्रथम मान्यवरांच्या हस्ते क्रांतीज्योति सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली.त्यानंतर स्कुलच्या वतीने सर्व मान्यवरांचे पुस्तक व स्मृतिचिन्ह भेट देऊन सत्कार करण्यात आले. यावेळी प्रा.नागसेन कांबळे पुढे बोलताना म्हणाले कि,पालकांनी आपल्या पाल्याच्या अवगुनापेक्षा त्यांच्यातील गुणाकडे लक्ष दिल्यास यशाची खात्री हमखास देता येते.शिक्षकांबरोबरच पालकांनीही आपल्या विद्यार्थ्यांच्या शारीरीक,बौद्धिक,मानसीक,
भावनिक,अशा सर्वांगीण विकासासाठी आपसात समन्वय साधुन सतत प्रयत्नशील असणे गरजेचे आहे असे सांगीतले.
यावेळी प्रस्ताविक करताना प्राचार्य शहाजी जाधव म्हणाले कि,या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश हा आपल्या पाल्यांच्या सर्वांगीण विकास साधण्यासाठी पालकांमध्ये अगोदर जागृती व त्यांचे प्रबोधन करणे अत्यावश्यक आहे असे सांगीतले.
यावेळी अध्यक्षीय भाषणात मनोहर वाघमोडे सर म्हणाले की,शाळेत शिक्षकाने विद्यार्थ्यांचे वाचन, लेखन,संभाषण कौशल्ये विकसित करून आत्मसन्मान वृद्धिंगत करावा आणि पालकांनी त्यांच्यात शिस्त,नितीमुल्य,जिव्हाळा,प्रेम,जागृत करून आत्मविश्वास वाढवावा जेणेकरून तो सुशिक्षित होण्याबरोबरच सुसंस्कारित बनेल असे सांगीतले.या कार्यक्रमाचे प्रस्ताविक प्राचार्य शहाजी जाधव व सूत्रसंचालन संचालीका मिस.सविता जाधव यांनी केले तर आभार सिद्धेश्वर सुरवसे सर यांनी मानले.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी स्कुलमधील शिक्षक हारुन हेड्डे,सुदर्शन भारती,शिक्षिका मिस. प्रियांका वचने पातील,मिस.बबिता शिंदे,मिस.मुमताज सवार,मिस.अनुराधा बंडगर,मिस.पूजा दाळिंबकर, मिस.सोनाली राठोड,मिस.प्रणाली घोडके,मिस.वर्ष सुरवसे,मिस.चांदबी चाऊस,अदिंनी परिश्रम घेतले. या कार्यक्रमास पालक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.
