- हरीनाम सप्ताहाची काल्याचे कीर्तनाने मोठ्या उत्साहात सांगता
- देखण्या ग्रंथ दिंडीने वेधले लक्ष हभप योगेश महाराज यांचे कीर्तन रंगले
इकबाल मुल्ला
लोहारा/प्रतिनिधी:- दारोदार काढलेली सुंदर रांगोळी,वारकरी यांच्या हाती भगवे ध्वज,महिलांच्या डोक्यावर तुलशी वृंदावन, टाळ-मृदंगाचा गजर अन् विठू नामाच्या जयघोषात निघालेल्या उस्मानाबाद तालुक्यातील सारोळा (बुद्रुक) येथील ग्रंथ दिंडी मिरवणूकीने ग्रामस्थांचे लक्ष वेधून घेतले़.दि.1 एफ्रिल रोजी काल्याचे कीर्तन व महाप्रसाद वाटपाने अखंड हरीनाम सप्ताहाची मोठ्या उत्साहात सांगता करण्यात आली़.प्रारंभी वारकरी सांप्रदायातील योगदानाबद्दल ज्येष्ठांचा पिताश्री श्रीमंतराव रणदिवे प्रतिष्ठानच्या वतीने सत्काराने गौरव करण्यात आला़. ग्रंथ दिंडीनंतर भाजपा मीडिया विभागाचे जिल्हाध्यक्ष तथा जिल्हा मराठी पत्रकार संघाचे जिल्हा अध्यक्ष धनंजय रणदिवे,सरपंच प्रशांत रणदिवे यांच्या हस्ते ह.भ.प योगेश महाराज पवार यांचा ग्रामस्थांच्यावतीने सत्कार करण्यात आला़.तसेच वारकरी सांप्रदायात योगदान दिल्याबद्दल वारकरी बांधवांचा फेटा,हार व श्रीफळ देवून पिताश्री श्रीमंतराव रणदिवे प्रतिष्ठानच्या वतीने सत्कार करण्यात आला़ .यावेळी उपसरपंच भाग्यश्री देवगिरे,बलराज रणदिवे,ग्रामपंचायत सदस्य विनोद बाकले,ज्योती देवगिरे व ग्रामस्थ उपस्थित होते़.
रणदिवे प्रतिष्ठानतर्फे वारकऱ्यांचा सत्कार
वारकरी सांप्रदायात योगदान दिल्याबद्दल पिताश्री श्रीमंतराव रणदिवे प्रतिष्ठानतर्फे जिल्हा मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष धनंजय रणदिवे यांच्या हस्ते 20 वारकऱ्यांचा सत्कार करण्यात आला़.फेटा,हार व श्रीफळ देवून वारकऱ्यांचा गौरव करण्यात आला़. तसेच ह.भ.प योगेश महाराज पवार यांचाही यावेळी सत्कार करण्यात आला़.यांचा झाला सत्कार
या सोहळ्यामध्ये ह.भ.प.योगेश पवार महाराज,ह.भ.प नामदेव पवार महाराज,ललत लिंगे,राजाभाऊ महाराज देवगिरे,रघुनाथ महाराज जाधव,सुतार महाराज,बबन मिटकरी,रावसाहेब मसे,अरूण मसे,संदीपान देवगिरे, शंकर जगदाळे,जालिंदर कोळी,पांडूरंग टिंगरे,शिवाजी मसे,रामा मसे,नागनाथ जडे,अंगद कोळगे,मन्मथ स्वामी,चोपदार अंकुश हिडगे,कल्याण रणदिवे,अनंत काकडे,मधुकर मसे,एकनाथ गुरव,विठ्ठल काकडे यांचा सत्कार करण्यात आला़.
