केज - तालुक्यातील नांदुरघाट शिवारात पारधी वस्तीवर आगीने तांडव केला राञी बारा च्या दरम्यान घरात राॅकेलची चिमणी पडल्याने घरात आग लागली घरात तीन लहान लेकर व नाना अर्जुन शिंदे व त्याची पत्नी झोपले होते अचानक आग जवळ आल्यावर गडबडीत उठून नाना शिंदे याने लेकर व पत्नी ला आगीत बाहेर काढले या मुळे जिवीतहानी टळली यात नाना चे हात व पायाला ईजा झाली परंतु जिवाची परवा न करता कुटुंब सुरक्षीत काढले .
या आगीत नानाचा संसाराची पुर्ण राख झाली रोख रक्कम ३० हाजार एक मोटारसायकल वर्ष भरा साठी ठेवलेले अन्न धान्य कपडे भांडे हे जळाली जवळपास पाण्याची सोय नसल्याने आग आटोक्यात आनता आली नाही. सकाळी तलाठी गावंडे यांच्या राईटरने पंचनामा केला असून शासन स्तरातून मदतीची अपेक्षा या कुटुंबाला आहे व रोजीरोजगार करनारे कुटुंब असून मदतीची अपेक्षा आहे आज या कुटुंबाला खाण्याची पंचायत आहे उघड्यावर पडलेल्या कुटुंबाला आधाराची प्रतिक्षा आहे
