इकबाल मुल्ला
लोहारा/प्रतिनिधी :- उमरगा तालुक्यातील मुरुम येथील जिल्हा परिषद मुलांच्या शाळेच्या प्रांगणात नेहरू युवा केंद्र उस्मानाबाद यांच्या वतीने तालुकास्तरीय खुल्या क्रीडा स्पर्धा दि.28 मार्च रोजी घेण्यात आल्या.यामध्ये कबड्डी,खो-खो, हॉलीबाल, गोळाफेक, रांगोली अशा विविध खेळाच्या स्पर्धा घेण्यात आल्या. या क्रीडा स्पर्धाचे उद्घाटन पंचायत समितीचे सदस्य अँड.राजासाहेब पाटिल यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रमुख म्हणुन पो.नि.मुस्तफा शेख, मुख्याध्यापक हनुमंत शिंदे,शालेय समितीचे प्रमोद कुलकर्णी,पत्रकार महेश निंबरगे,सामाजिक कार्यकर्ते रामलिंग पुराणे,क्रीडा शिक्षक भिलसिंग जाधव,सुजित शेळके,बेग सर,तुळशिराम देडे,नेहरू युवा केन्द्राचे गांधीजी गायकवाड़,सुधाकर बनसोडे आदि उपस्थित होते.या स्पर्धेत उमरगा तालुक्यातील अनेक गावातील क्रीडा संघानी सहभाग घेतला आहे.या कार्यक्रमाचे प्रस्ताविक तुळशीराम देडे व सूत्रसंचालन वंदना जाधव यांनी केले तर आभार देशमाने सर यांनी मानले.या कार्यक्रमास नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
