इकबाल मुल्ला
लोहारा/प्रतिनिधी :- लोहारा शहरातील नगरसेवक शामनारायणकर यांच्या प्रभाग क्रं.10 मध्ये दलीत वस्ती योजनेतील साडे बारा लाख रुपये निधीतील नाली कामास सुरुवात करण्यात आली. या प्रभाग क्रं.10 मधील नाली कामाचे उदघाटन दि.2 एफ्रिल रोजी आ.ज्ञानराज चौगुले यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी शिवसेना युवा नेतै किरण गायकवाड,नगराघ्यक्षा पोर्णिमा जगदिश लांडगे,
उपमगराध्यक्षा नाजमिन शेख,मुख्याधिकारी सोनम देशमुख,गटनेते तथा नगरसेवक अभिमान खराडे,या प्रभागाचे नगरसेवक शाम नारायणकर,शिवसेना तालुका प्रमुख मोहन पणुरे,शहर प्रमुख सलीम शेख, माजी तालुका प्रमुख ज्ञानेश्वर सुर्यवंशी,बलभीम येवते, युवा सेना तालुका प्रमुख दिपक मुळे,युवा सेना शहर प्रमुख श्रीकांत भरारे,इन्नुस पटेल,प्राचार्य शहाजी जाधव,रॉष्ट्रवादी कॉग्रेस शहराध्यक्ष आयुब शेख,माजी सरपंच अरुण माळवदकर,शिवा स्वामी,रफिक शेख,संजय दरेकर,नजिर शेख,राजेंद्र सुर्यवंशी,रज्जब फकीर,विजय ढगे,युवक कॉग्रेस शहराध्यक्ष हरी लोखंडे,प्रकाश माळवदकर,यांच्यासह महिला व नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
