लोहारा शहरातील बाजार समितीच्या आवारात नाफेडच्या वतीने दि.29 मार्च रोजी आधारभूत हरभरा खरेदी केंद्राचे उदघाटन जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष अशोकराव जवळगे यांच्या हस्ते करण्यात आले.



इकबाल मुल्ला
लोहारा/प्रतिनिधी:-  लोहारा शहरातील बाजार समितीच्या आवारात नाफेडच्या वतीने दि.29 मार्च रोजी आधारभूत हरभरा खरेदी केंद्राचे उदघाटन जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष अशोकराव जवळगे यांच्या हस्ते करण्यात आले.नाफेडने यशवंतराव चव्हाण कृषी संस्थेला हमीभावाने हरभरा खरेदी करण्याची परवाणगी दिली आहे.त्यानुसार येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात हरभरा खरेदी केंद्र सुरू करण्यात आले आहे.यावेळी प्रमुख म्हणुन बाजार समतिचे उपसभापती प्रा.आनंदराव सूर्यवंशी,बाजार समितीचे संचालक शंकर जट्टे,चव्हाण कृषी संस्थेचे अध्यक्ष दिनकरराव जावळे-पाटील,बाजार समितीचे सचिव जयवंत पाटील,अदि उपस्थीत होते.आतापर्यंत या संस्थेकडे एक हजार दोनशे हरभरा उत्पादक शेतकऱ्यांनी ऑनलाईन नोंदणी केली आहे.त्यानुसार नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांना विक्रीसाठी हरभरा घेऊन येण्याबाबत एसएमएस पाठविण्यात आले आहेत.लोहारा तालुक्यातील शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात हरभरा पीक घेतले आहे.उत्पादनही समाधानकारक झाले आहे. परंतु नाफेडने हेक्टरी दहा क्विंटल हरभरा धान्य खरेदी करण्याची अट घातली आहे. त्यामुळे शेतकरी अडचणीत आले आहेत. हेक्टरी दहा ऐवजी वीस क्विंटल प्रमाणे हरभरा खरेदी करण्यात यावी,अशी मागणी शेतकऱ्यांतून होत आहे. या कार्यक्रमास बालाजी साळुंके,प्रभाकर बिराजदार, अजमेर दाळींबकर,भगवान मक्तेदार,चंद्रकांत  वाघमारे,हबीब देशमुख,विनोद जावळे,दत्तात्र्य पाटील, गणेश कस्तुरे,यांच्यासह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

SHARE THIS

Author:

Previous Post
Next Post