नागुर येथील तलाठी सांलुके शेतीची फेरफार नोंद घेण्यास टाळा टाळ करीत असल्याने दि.15 ऑगस्ट रोजी तहसील कार्यालयासमोर आत्मदहन करणार


इकबाल मुल्ला
लोहारा/प्रतिनिधी :- लोहारा तालुक्यातील नागुर येथील तलाठी डी.पी.सांलुके शेतीबाबतचे फेरफार कायदेशीर वारसांचे नांवे घेण्यासाठी टाटाळ करीत आहेत.तरी वारसांची नोंद घ्यावी अन्यथा तहसील कार्यालयासमोर दि.15 ऑगस्ट रोजी आत्मदहन करणार असल्याचे निवेदन  साहेबराव दगडु कांबळे यांनी तहसीलदार यांना दिले आहे.
या निवेदनात म्हटले आहे कि,मि नागुर येथील रहिवाशी असुन आमची वडीलोपार्जी कब्जेवहीटीतील
जमीन सर्वे 8/1 मध्ये 00 हे 30 आर ज्याचा आकार 0.98 पैसे एवढी जमीन वडील दगडु हरीबा कांबळे यांच्या नावावर आहे.
माझे वडील दगडु हरीबा कांबळे रा.नागुर ता.लोहारा जि.उसमानाबाद हे दि.2/10/2004 रोजी मयत झाले असुन त्यांच्या पाश्चात नागुर येथील वरील सर्वे नं.8/1 मधील शेतीबाबतचे फेरफार कायदेशीर वारसांच्या नावे घेण्यासाठी मि नागुर सज्जाचे तलाठी डी.पी.
सांलुके यांच्याकडे एक वर्षापुर्वी रितसर सर्व  कागदपत्रे व अर्ज दाखल केला आहे.परंतु तलाठी सांलुके हे ऑनलाईन नेट बंद आहे.,मी बाहेर गावी आलो आहे.नंतर तुमचे काम करतो असे म्हणुन वारंवार फेरफार घेण्याबाबत टाळाटाळ करीत आहेत.
त्यामुळे मला नाहक आर्थिक व मानसीक त्रास सहन करावा लागत आहे.तसेच मला प्रधानमंत्री पिक विमा योजना,नुकसान भरपाई,अनुदान,शेतीजमीनीची मोजणी,हद्द कायम करणे,यासह विविध शासकीय योजनांचा लाभ घेण्यापासुन वंचीत रहावे लागत आहे.
माझ्या पाश्चात वयोवृध्द आई,पत्नी,दोन मुली,असा परिवार आहे.मी अनेकवेळा तलाठी सांलुके यांना फेरफार घेण्याबाबत विनंती करुनही ते चालढकल करीत आहेत.त्यामुळे दि.14 ऑगस्ट पुर्वी माझ्या नावे जमीनीची फेरफार नोंदीची कार्यवाही पुर्ण करावी,
अन्यथा दि.15 ऑगस्ट रोजी मी कोणत्याही क्षणी लोहारा तहसील कार्यालयासमोर आत्मदहन करणार असुन माझ्या जीवाला कांही बरे वाईट झाल्यास तलाठी सांलुके व महसुल विभाग जबाबदार राहील, असे निवेदनात म्हटले आहे.या निवेदनाची प्रत लोहारा पोलीस ठाणे यांनाही देण्यात आली आहे.

SHARE THIS

Author:

Previous Post
Next Post