पुर्णा दंगल प्रकरणी शासकीय फिर्यादी वरुन ५४ आरोपीं विरोधात गुन्हें दाखल..


  • नगरसेवक हाजी कुरेशी व विक्रम कदम यांनी परस्पर विरोधात दिलेल्या फिर्यादी वरुन ७४ आरोपीं विरोधात गुन्हें दाखल

पुर्णा :-  शहरात काल शनिवार दि.२५ अॉगस्ट रोजी दुपारी ०२-३० ते ०४-०० वाजेच्या दरम्यान बसस्थानक परिसरात एका शाळकरी मुलीला लागलेल्या गाडीच्या धक्क्यावरुन शहरात उसळलेल्या दंगलीत शहरातील अशोक रोड,किंग कॉर्नर,नांदेड टी पॉईन्ट,अन्य परिसरांमध्ये गैर कायद्याची मंडळी जमवून दगडफेक करीत अडथळा निर्माण करुन शासकीय कर्मचाऱ्यास दुखापत करुन शासकीय वाहणांचे नुकसान केल्या प्रकरणी शासना तर्फे पोउपनि.गणेश राठौड यांनी दिलेल्या फिर्यादी वरुन आज रविवार दि.२६ अॉगस्ट रोजी शे.नईम शे.सकुर,शे.नासेर शे.हमीद,मो.सादीक कुरेशी,मो.सिध्दीक कुरेशी,तुकाराम कदम,नईम बेग,भारत बुरड,राजु सोळंके,शे.अकरम शे.हबीब,विष्णू कदम,अतुल बाबर,सोमनाथ शिराळे,अक्षय कहाते,कैलास पिडगे,गोविंद सोलव,पडोळे,गणेश सोलव,किशन सोलव,कल्याण कदम,मुंजा कदम,मोसिन कुरेशी,सौरव जोगदंड,अभी कदम,कामेश अंबोरे व इतर २० ते ३० आरोपीं विरोधात गुरनं.१३१/१८ चे कलम ३३३,३३५,१४३,१४७,१४९,३३७,३३६,४२७ भादवी तसेच कलम १३५ मुंबई पोलीस कायदा,कलम ७सा.म.नु.प्र.का.कलम ७ क्रिमीनल लॉ ॲमेन्डमेन्ट ॲक्ट अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले असून उसळलेल्या दंगली नंतर समाजकंठकांनी शिवसेना जिल्हा प्रमुख विशाल कदम यांचे नांदेड टि पॉईन्ट परिसरातील आर्यन वे ब्रिज काट्या जवळील शिवसेना कार्यालयाची प्रचंड तोडफोड करुन कार्यालयाची नासधूस केल्या प्रकरणी त्यांचे बंधू विक्रम विजयकुमार कदम यांनी दिलेल्या फिर्यादी वरुन मा.उपनगराध्यक्ष तथा विद्यमान रा.काँ.नगरसेवक हाजी कुरेशी,अमजद मनीयार,सुमेर ॲटोमोबाईल्सचा मालक,सिध्दीकी कुरेशी,सुमेर कुरेशी,शे.मुजाहीद उर्फ मुज्जू,सना जनरल स्टोअर वाला,फारुख गॕरेजवाला,महाराष्ट्र ॲटो मोबाईल्सवाला,स.मुजाहीत स.डाउन,डायमंड मटन शॉपवरील नौकर,एमआयएम कार्यकर्ता शेख अकरम,म.शफीक म.रफीक,शे.समीर शे.जाफर,करीम खान,इलियास चाऊस,असलम नुरीवाला, व इतर सोबतचे ५० ते ६० आरोपीं विरोधात पुर्णा पोलिस स्थानकात गुरनं.१३०/१८ चे कलम ३२४,१४३,१४८,१४९,४५२,४२७,भादवी सह मपोका कलम १३५ क्रि.लॉ.अ.ॲक्ट कलम ७ प्रमाणे गुन्हे दाखल करण्यात आले असून नगरसेवक हाजी कुरेशी यांना शाळकरी मुलीस गाडीचा धक्का लागलेच्या कारणावरुन झालेल्या मारहान प्रकरणी आरोपी सोमनाथ सोलव,किशन सोलव,पडोळे,गोविंद,कैलास पिडगे,सोमनाथ शिराळे,अतुल बाबर,अक्षय कहाते,कल्याण कदम,मुंजा कदम,विष्णू कदम,पप्पू कदम,विक्की कदम,आदी आरोपीं विरोधात कुरेशी यांनी पुर्णा पोलीस स्थानकात दिलेल्या फिर्यादी वरुन गुरनं.१२९/१८ चे कलम ३२६,१४३,१४८,१४९,सह मपोका कलम १३५ क्रि.लॉ.ॲक्ट प्रमाणे गुन्हें दाखल करण्यात आले असुन जिल्हा पोलीस अधिक्षक कृष्णकांत उपाध्याय यांच्या उपस्थितीत त्यांच्या मार्गदर्शनाखाली डिवायएसपी सुधाकर रेड्डी,पुर्णा पोलिस स्थानकाचे पो.नि.सुनील ओव्हळ यांनी व सहकारी अधिकारी प्रविण धुमाळ,चंद्रकांत पवार,गणेश राठौड,तसेच सहकारी कर्मचारी तसेच राज्य राखीव दलाच्या तुकडीने परिस्थिती अत्यंत काटेकोरपणे हाताळल्याने आज शहरातील परिस्थिती पुर्वपदावर आली असून शहरात सर्वत्र शांततेचे वातावरण निर्माण झाले आहे

SHARE THIS

Author:

Previous Post
Next Post