2018-19 वर्षाचा स्काऊट-गाईड जिल्हा मेळावा लोहार हायस्कुल, लोहार येथे होणार- जनार्दन इरले (जिल्हा संघटन आयुक्त)



  • लोहारा हायस्कुल लोहारा येथे तालुकास्तरीय स्काऊट-गाईड उजळणी वर्ग संपन्न

इकबाल मुल्ला
लोहारा/प्रतिनिधी :- लोहारा हायस्कुल येथे तालुकास्थरिय स्काऊट-गाईड उजळणी वर्ग घेण्यात आला.
यावेळी लोहारा हायस्कुल येथील स्काऊट-गाईड मास्टर वैजनाथ पाटील व सतीश जट्टे यांच्या मार्गदर्शनाखाली संचलन व ध्वजारोहण करण्यात आले.व तसेच राज्य पुरस्कार मिळवलेले मराठवाड्यातील एकमेव ट्रेनर(कब) दिपक पोतदार यांनी अनमोल मार्गदर्शन केले.कब-बुलबुल,स्काऊट-गाईड,रोव्हर-रेंजर यांच्या अभ्यासक्रमाबद्दल व परिक्षेबद्दल त्यांच्याकडून सखोल मारदर्शन झाले.


या कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा जिल्हा संघटन आयुक्त जनार्दन इरले यांनी राष्ट्रीय स्थरावर होणाऱ्या प्रशिक्षणाची माहिती दिली.तसेच यावर्षीचा जिल्हा स्काऊट-गाईड मेळावा लोहारा हायस्कुल,लोहारा येथे यावर्षी डिसेंबर मध्ये होणार असल्याचे जाहीर केला. या मेळाव्यास सर्व शाळांनी सहभाग नोंदवून जिल्हा मेळावा यशस्वी करण्याचे आवाहन केले.
या कार्यक्रमास आवर्जून उपस्थित असलेले लोहारा विस्तार अधिकारी एन.टी.आदटराव,प्रशालेचे मुख्याध्यापक एस.एन.पांचाळ,राष्ट्रपती गाईड पुरस्कार प्राप्त श्रीमती आर.ए.पठाण,अदि उपस्थित होते.यावेळी लोहारा हायस्कुल येथील स्काऊट-गाईड मधील गोल्ड मेडल पुरस्कार प्राप्त 17 विध्यार्थ्याचे व त्यांचे मारदर्शक स्काऊट मास्टर वैजीनाथ पाटील व सतिश जट्टे यांचा सत्कार  करण्यात आला.
2019 मध्ये उत्तरअमेरिका येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय जाम्भोरीसाठी उस्मानाबाद जिल्ह्यातून 3 स्काऊट शिक्षकांची निवड झाल्याने व्ही.एन.क्षीरसागर,बी.के. खामकर,एम.एस.निकम यांचे अभिनंदन करण्यात आले.
या कार्यक्रमास लोहारा तालुक्यातील स्काऊट मास्टर व्ही.बी.राठोड,एम.व्ही.बोकडे,एम.एस.पांढरे,एम.डी. सूर्यवंशी,यांच्यासह स्काऊट मास्तर विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.या कार्यक्रमाचे सूत्र संचालन सतीश जट्टे यांनी केले.तर आभार आनंद देशेट्टे यांनी मानले.

SHARE THIS

Author:

Previous Post
Next Post