विविध प्रलंबीत मागण्यांसाठी शासकीय कर्मचाऱ्यांनी लोहारा तहसील कार्यालया समोर संप करुन ठीय्या आंदोलन केले


लोहारा/प्रतिनिधी :- विविध प्रलंबित मागण्यासाठी शासकीय कर्मचाऱ्यांनी राज्यव्यापी संप पुकारला आहे.या संपात मोठ्या प्रमाणात कर्मचारी सहभागी झाले आहेत.दरम्यान
लोहारा तहसील कार्यालयासमोर कर्मचाऱ्यांनी ठिय्या आंदोलन केले.या संपामुळे तहसील,पंचायत समिती कार्यालयातील कामकाज ठप्प झाले आहे.परिणामी नागरिकांची कामे खोळंबली असून अनेकांना रिकाम्या हाताने परतावे लागले.
        सातवा वेतन आयोग त्वरीत लागू करावा,जुनी पेन्शन योजना चालू करावी,पाच दिवसाचा आठवडा करण्यात यावा,सेवा निवृत्तीचे वय साठ वर्ष करण्यात यावे,खासगीकरण बंद करावे,रिक्तपदे त्वरीत भरण्यात यावे यासह विविध प्रलंबित मागण्यासाठी शासकीय कर्मचाऱ्यांनी मंगळवारपासून सलग तीन दिवस संप पुकारला आहे.तालुक्यातील कर्मचाऱ्यांनी संपात मोठा सहभाग घेतल्यामुळे तहसील,पंचायत समिती यासह अन्य कार्यालयाचे कामकाज ठप्प झाले.संपात सहभागी होऊन तहसील कार्यालयासमोर कर्मचाऱ्यांनी ठिय्या आंदोलन केले.प्रविण निंबाळकर, पी.एम.चौगुले,श्रीनिवास पाटील,अशोक शिंदे,बालाजी  चामे,महादेव जगताप,किरण निंबाळकर,मदन  सोमवंशी,संभाजी बिराजदार,ए.एस.रांजणकर, एस.डी.पांचाळ यांच्यासह बहुसंख्य कर्मचारी संपात सहभागी झाले होते.
      शहरातील ग्रामीण रूग्णालयातील परिचारक व कर्मचारी संपावर गेल्यामुळे रूग्णाची गैरसोय झाली. उमाकांत डिग्गे,उमाकांत,संतोष मस्के,चांदणी मोरे, वनिता कोळी,पूजा घोडके,ज्योती पाटील,आदिनाथ फुलसुंदर,मंगल कोळगे,अनिता टिकांबरे,महादेव सिरसाट आदी संपात सहभागी झाले होते.

SHARE THIS

Author:

Previous Post
Next Post