मुस्लीम समाजाला शिक्षण व नौकरीमध्ये आरक्षण द्यावे,या मागणी साठी मुस्लीम आरक्षण संघर्ष समितीच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन


इकबाल मुल्ला
लोहारा/प्रतिनिधी :- मुस्लीम समाजाला शिक्षण व नौकरीमध्ये 5 % आरक्षण द्यावे,या मागणी साठी मुस्लीम आरक्षण संघर्ष समितीच्यावतीने उस्मानाबाद जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दि.4 ऑगस्ट रोजी एक दिवशीय धरणे आंदोलन करण्यात आले.
यावेळी राज्य शासनाच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली.या आंदोलनास उस्मानाबाद सकल मराठा समाजाने जाहीर पाठींबा दिला.या आंदोलनास्थळी आ.राणा जगजितसिंह पाटील यांनी
हजेरी राहुन मुस्लीम साजाला जाहीर पाठींबा दिला.
यावेळी राष्ट्रवादी कार्याध्यक्ष सुरेश देशमुख,अदि उपस्थित होते.
या आंदोलन कर्त्यांनी मुस्लीम आरक्षण मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी यांना दिले.या निवेदनात म्हटले आहे कि,देशामध्ये रहात असलेला मुस्लीम समाजाची आर्थिक, सामाजिक,शैक्षणिक,राजकीय,परिस्थिती इतर समाजापेक्षा अंत्यत खालावलेली असुन सदर समाजा पैकी 37 % पेक्षा जास्त लोक दारिद्र्य रेषेखालील जिवन जगत आहेत.हे शासनाच्या सच्चर आयोग,रंगनाथ मिश्रा आयोग,महेमुद रहेमान कमेटी यांनी दाखवुन दिला आहे.या समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी वरील समित्यांनी शिक्षण व नौकरीमध्ये आरक्षण देण्याविषयी सुचित केले आहे.
त्यानुसार तात्कालीन सरकारने अध्यादेशद्वारे शिक्षण व नौकरीमध्ये मुस्लीम समाजाला 5 % आरक्षण दिले होते.हे प्रकरण मा.उच्च न्यायालयात गेले असता मा.
उच्च न्यायालयात मुस्लीम समाजाची शैक्षणिक मागासलेपणा पाहता शासनाने दिलेले 5 % आरक्षण मान्य केले होते.हे आरक्षण लागु करण्यासाठी कायदा करणे जरुरी होते.परंतु भाजप सरकारने जाणुन बुजुन हेतु परस्पर मुस्लीम समाजावर अन्याय केला आहे.
तरी राज्य शासनाने मुस्लीम समाजाला आरक्षण देण्यात यावे,अशी मागणी निवेदनात केली आहे.
या आंदोलनात मसुद शेख,खादर खान,समयोद्दीन मशायक,खलीफा खुरेशी,वाजीद पठाण,मैनुद्दीन पठाण,तौफिक शेख,इलियास पिरजादे,बिलाल तांबोळी,हाफीज आलीम शेख,आयुब अब्दुल शेख,
हाजी बाबा शेख,महेबुब गवंडी,अस्लम खाणापुरे,
इकबाल मुल्ला,सत्तार शेख,गफार काझी,उस्मान निचलकर,अन्वर शेख,ईस्माइल शेख,असद पठाण,
आय्याज शेख,खलील पठाण,एजाज काझी,युसुफ शेख,अकबर तांबोळी,फेरोज शेख,बाबा मुजावर,
आयुब हबीब शेख,अश्फाक शेख,यांच्यासह जिल्ह्यातील मुस्लीम समाज मोठ्या संख्येने सहभागी होते.

SHARE THIS

Author:

Previous Post
Next Post