आता बंजारा समाज ही आरक्षणासाठी मैदानात उतरुण आंदोलन करणार — महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष भारतीय बंजारा क्रांती दल पक्ष किशोर पवार


इकबाल मुल्ला
लोहारा/प्रतिनिधी :- आता बंजारा समाज ही आरक्षणासाठी मैदानात उतरणार असल्याची माहीती महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष भारतीय बंजारा क्रांती दल पक्ष किशोर पवार यांनी दिली.
यावेळी किशोर पवार म्हणाले कि,भारत सरकारने बंजारा समाजाला वेगवेगळ्या राज्यात वेगळे आरक्षण दिले आहे.या मुळे या समाजाचे फार मोठ्या प्रमाणात
नुकसान झाले आहे.
 आंध्रप्रदेश मध्ये एस.टी.कर्नाटक राज्या मध्ये एस.सी.वं महाराष्ट्र राज्यामध्यो मध्ये वी.जे.एन.टी
 असे का?
   बंजारा समाज हा अतिशय गरीब आहे या समाजाला आर्थिक सामाजिक,राजकीय समानता मिळत नाही,महाराष्ट्र शासनाने 70 वर्षे आमचा हक्क हिसकावून घेतले आहे.आज केंद्रात व राज्यात भारतीय जनता पार्टी सरकार आहे.आपण सर्व जातील भारतात समान आरक्षण दिले आहे.त्या प्रमाणे एस.टी.मध्ये सर्व भारतातील बंजारा समाज ला समाविष्ट करण्यात आले पाहिजे,
   अन्यथा बंजारा आपले आंदोलन उग्र रूप धारण करून भारत बंद करुन,न्याय मागेल व भारतात हक्काचे व्यासपीठ तयार करण्यात येईल.
      बंजारा समाज गेली कित्येक वर्ष भटक्या विमुक्तांसाठी,आरक्षणाची मागणी करीत आहे,परंतु सरकारचे या समाजाकडे पुर्णपणे दुर्लक्ष आहे. क्रिमिलिअर मधूम भटके विमुक्त,बलुतेदार यांना काढण्याची मागणी,गेली चार वर्ष सातत्याने आम्ही करीत अजून,प्रत्येक अधिवेशनामध्ये विधानपरिषद मध्ये लक्षवेधी सूचनेला उत्तर देतांना,मंत्रांनी एका महिन्यात निर्णय घेवू असे वारंवार आश्वासन दिले.
    पण ते पाळले गेले नाही,याचाच अर्थ या संदर्भात मा.सभापती महोदवांनी शासनास फाईल, मंत्रालयाच्या सामान्य प्रशासन विभाग,विधी विभाग, राज्य मागास आयोग,असा खेळ चालू आहे.खरे तर हा  गुन्हा आहे.
   एम.पी.एस.सी मध्ये प्रचंड घोटाळा चालू असून, विशेषता: धनगर,वंजारी,आणि बंजारा समाजातील मुले मुली खेळाडू डावलल्या जात असून,लाखो रुपये घेऊन,कमी मार्कवाल्यांना निवड करून भरती करणे चालू आहे.मागासवर्गीयांना डावलून या ठिकाणी खुल्या प्रवर्गातील उमेदवारांची निवड होत आहे.
   प्रमोशन मध्ये आरक्षण देण्याच्या संदर्भात सर्वोच्च न्यायालयात निर्णय होवू नाही,सरकार या कडे दुर्लक्ष करत आहे.ओबीसी सह बंजारा भटके विमुक्त,बारा बलुतेदार,मराठा कुणबी या समाजाची जातीवार जनगणना करावी,या मागणीकडे सुद्धा शासन दुर्लक्ष करीत आहे.बंजारा भटके-विमुक्त यांना वेगळा आरक्षण दयावे.
   या मागणीसाठी किशोर (भाऊ) पवार महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष भारतीय बंजारा क्रांती दल पक्ष यांच्या मार्गदर्शनाखाली आणि प्रदीप (भाऊ) राठोड जय हिंद करिअर अकॅडमी मुंबई चे संस्थापक अध्यक्ष यांच्या माध्यमातून आंदोलन मुंबई येथे करण्यात येणार आहे.  बंजारा समाज मैदानात उतरणार असून,मुंबई आझाद मैदान येथे दि. 8 ऑगस्ट 2018 रोजी प्रचंड धरणे आंदोलन करण्यात येणार आहे.महाराष्ट्रात विविध ठिकाणी मोर्चे काढण्यात येणार आहेत.अशी माहीती किशोर पवार यांनी दिली.

SHARE THIS

Author:

Previous Post
Next Post