उस्मानाबाद शहरात लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी


इकबाल मुल्ला
लोहारा/प्रतिनिधी :- सह्याद्री फाऊंडेशन व चाईल्ड लाईन यांच्यावतीने रुपामाता विद्यालय व ईरा इंटर नँशनल स्कुल मध्ये लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती व लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली.
यावेळी प्रमुख म्हणुन सह्याद्रि फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष डॉ.दापके दिग्गज देशमुख,रुपामाता समुहाचे अध्यक्ष अँड.व्यंकटराव गुंड,अदि उपस्थित होते.


या कार्यक्रमाचे औचित्य साधुन निराधार व अनाथ मुलांना मदत करणाऱ्या 1098 या टोल फ्रि नंबरची जनजागृती करण्यात आली.व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करुन प्रमाणपत्र वाटप करण्यात आले.
या कार्यक्रमास सह्याद्रि चे समन्वयक गजानन पाटील,
रुपामाताच्या मुख्याध्यापीका रुपाली यादव,बालाजी घोडके,प्रशासकीय अधिकारी भोसले,ईराचे मुख्याध्यापक आरुण सर्वपल्ली,जी.बी.गुंड,एस.एल.
श्रीखंडे,यांच्यासह नागरीक,पालक,विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

SHARE THIS

Author:

Previous Post
Next Post