डॉ.बाबासाहेब आंबेडकर प्राथमिक विद्यालय,व रुपामाता माध्यमिक विद्यालय पाडोळी(आ.) येथे पालक सभा संपन्न


इकबाल मुल्ला
लोहारा/प्रतिनिधी :- उस्मानाबाद तालुक्यातील पाडोळी(आ) येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर प्राथमिक विद्यालय व रुपामाता माध्यमिक विध्यालयात दि.4 ऑगस्ट रोजी   शैक्षणिक वर्ष 2018 —19 करिता माता पालक  व पालक शिक्षक संघाची स्थापना करण्याच्या उदेद्शाने पालक सभा घेण्यात आली.
     या सभेच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक सुरवसे सर होते.प्रमुख म्हणुन मनसुळे सर, शिक्षणप्रेमी नागरीक व शाळा व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी धनंजय पाटील,माजी पालक समिती सदस्य चव्हाण गजेंद्र,तसेच यशस्वी उद्योजक व गावचे प्रतिष्ठित नागरीक राजकुमार झिरमीरे,अदि उपस्थित होते.यावेळी सर्वप्रथम प्रमुख मान्यवरांच्या हस्ते सावित्रीबाई फुले व सरस्वती प्रतिमेचे पूजन करण्यात आले.यावेळी शालेय विद्यार्थ्याना अध्ययनात येणाऱ्या अडचणी,गुणवत्ता विकास आणि शालेय शिस्त या विषयावर पालक  — शिक्षक याच्यात अगदी खेळीमेळीच्या वातावरणात चर्चा करण्यात आली. पालकातुन ही प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आली कि, यापुढे अशाच प्रकारच्या सभा दर दोन महिन्याला घेण्यात याव्या असे पालकांनी सुचविले.तेव्हा मुख्याध्यापक सुरवसे यांनी म्हटले की,जर अशा प्रकारचा उदंड प्रतिसाद पालकांचा मिळाल्यास यापुढे दर दोन महिन्याला आपण पालक सभा निश्चित घेऊ असे सांगितले.यावेळी राजकुमार झिरमिरे व दिपक पवार,अदिंनी सविस्तर मार्गदर्शन केले


या पालक सभेत शासन निर्णयाप्रमाणे प्रथमत: सर्व पालकांना पद्सिद्ध कायम सदस्य करण्यात आले.व उपस्थित पालक वर्गातून चालू शैक्षणिक वर्षाकरिता पालक व माता पालक संघाची स्थापना करण्यात आली.यात संघाचे मुख्याध्यापक हे पद्सिद्ध अध्यक्ष असल्याने बोचरे श्रीहरी आगतराव यांना पालक संघाचे उपाध्यक्ष तर श्रीमती गाते प्रिया कल्याण यांची माता पालक संघाचे उपाध्यक्ष म्हणून सर्वानुमते  निवड करण्यात आली.तर दिपक पवार,मंजुळा माने, किसन काळे,गरड मनिषा,अनिता राऊत,रेशमा गुंड, माया पवार,यांची सदस्य म्हणून निवड करण्यात आली.या निवडीनंतर माता पालक व पालक शिक्षक संघातील सर्व नुतन सदस्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.
 कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिक्षक ए.एन.गुंड, एस.जी.सुर्यवंशी,पी.डी.सुर्यवंशी,पी.व्ही.ईर्लेकर,आर. एन,राख,श्रीमती व्ही.एल.माळी,श्रीमती एम.एस.गुंड, सोनकटले सर,बी.एम शेख,पवार सर,अदिंनी परीश्रम घेतले. या कार्यक्रमाचे प्रस्ताविक शाळेचे  मुख्याध्यापक आर.डी.सुरवसे व सुत्रसंचलन शेख सर यांनी केले.तर आभार शाळेचे मुख्याध्यापक एस.एम. मनसुळे यांनी  मानले.या कार्यक्रमास महिला व नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

SHARE THIS

Author:

Previous Post
Next Post