मौलाना अबुल कलाम आझाद उर्दु शाळेत सह्याद्री फाऊंडेशन्स तर्फे 1098 टोल फ्री नंबरची जनजागृती मोहीम व गुणवंत विद्मार्थ्यांचा सत्कार कार्यक्रम संपन्न


इकबाल मुल्ला
लोहारा/प्रतिनिधी :- सह्याद्री फाऊंडेशन उस्मानाबाद यांच्यावतीने शहरातील मौलाना अबुल कलाम आझाद उर्दु प्रायमरी अँड हायस्कुल येथे *1098* या चाईल्ड लाईन टोल फ्री नंबर जनजागृती मोहीम व गुणवंत विद्मार्थ्यांचा सत्कार कार्यक्रम घेण्यात आला.
यावेळी प्रमुख म्हणुन डॉ.दीग्गज दापके देशमुख,डॉ. वसुंधरा दिग्गज दापके,ईफ्तेखार पटेल,बिलाल रजवी, डॉ.अरशद रजवी,बिलाल काझी,पत्रकार सलीम  पठाण,मौलाना अबुल कलाम आझाद उर्दु प्रायमरी


अँड हायस्कुल चेअरमन हाफीझ अलीमोद्दीन,अदि उपस्थित होते.यावेळी अक्सा चौक ते शम्स चौका पर्यंत आपल्या स्व:खर्चाने वृक्षरोपन व अक्सा चौकात नागरीकांसाठी वाचनालय सुरु  केल्या बद्दल सामाजिक कार्यकर्ते व तरुण नेते *असलम मुलाणी* यांचा सत्कार मौलाना अबुल कलाम आझाद संस्थेकडुन *डॉ.दिग्गज दापके व डॉ.वसुंधरा दापके* यांच्या हस्ते करण्यात आला,या कार्यक्रमास शाळेतील विद्यार्थी /शिक्षक/पालक मोठ्या संख्यने उपस्थित होते.

SHARE THIS

Author:

Previous Post
Next Post