पूर्णा -{राजेश वालकर} रविवार दि.05 रोजी शासकीय विश्रामग्रह पूर्णा येथे अखिल भारतीय उपभोक्ता उत्थान संघटनेचे राष्ट्रीय संघटन सचिव बाळासाहेब पांडे यांच्या अधीकार पत्राद्वारे पूर्णा तालुकाध्यक्ष पदी संजय वाघमारे यांना नियुक्तीचे पत्र देऊन निवड करण्यात आली. यावेळी बाळासाहेब पांडे बोलतांना म्हणाले की,आपली संघटना संपूर्ण भारत देशामध्ये शासन आणि प्रशासन यांना लिखित कळवून कायदेशीर मार्गाने कार्यरत असल्याचे सांगितले सर्व सामान्य जनतेच्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी विधितज्ञ यांच्या मार्फत तत्पर कार्यवाही करून जनतेचे हक्क-अधिकार मिळवून देण्यासाठी संघटना कार्यरत असल्याचे सांगून अनेक तक्रारीची सोडवणूक केल्याचे उदाहरण देत पांडे यांनी संघटनेची भूमिका विशद केली. यावेळी संघटनेचे मराठवाडा विभागीय अध्यक्ष नाथा पाटील कुऱ्हे,महाराष्ट्र संघटक अशोक सुरुशे, महिला आघाडी नांदेड जिल्हाध्यक्ष यशोदा कोळी,सचिव शारदा आबादार,हिंगोली तालुकाध्यक्ष भिकाजी मोहनकर,परभणीचे के जी कीर्तने उपस्थित होते. तर माहेबूब कुरेशी,विनायक देसाई,मधुकर मूळे, गिरीश कदम,हबीब बागवान,बळीराम माटे,उत्तम जोंधळे,अनिल छडीदार,नागेश आहिरे,पंचशीला खंदारे,मधुरा गरड यांनी पुढील कार्यास शुभेच्छा देत वाघमारे यांचे अभिनंदन केले.
Author: Moeez Shaikh
Related Posts
Some simillar article from this label, you might also like
- Blog Comments
- Facebook Comments
Subscribe to:
Post Comments (Atom)
