विकास विसरून सरकारची मंदिरावर चर्चा: चिदंबरम


कोलकाता :- नोटाबंदीला दोन वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी मोदी सरकार वर टीका केली आहे. 'सरकार आपलं अच्छे दिनचं आश्वासन विसरलंय. आता विकास, नोकऱ्या, गुंतवणूक, उत्पन्नाची चर्चा नाही, केवळ हिंदुत्वाचा अजेंडा आहे आणि मंदिर भव्य पुतळ्यांवर चर्चा होतेय,' असं चिदंबरम एका पत्रकार परिषदेत म्हणाले.

'नोटाबंदीमुळे बनावट नोटांचा बाजार बंद झालेला नाही. खोट्या नोटा बनवणारे दोन हजार, पाचशेच्या नोटा तयार करताहेत. नोटाबंदीच्या वेळी बाद करण्यात आलेल्या सर्व ९९.३ टक्के नोटा आरबीआयकडे पुन्हा आल्या आहेत. प्रत्यक्षात सर्व अमान्य नोटा बँकेच्या काऊंटरवर एक्स्चेंज केल्या गेल्या. सरकारने ही आर्थिक घोटाळ्याचे योजनाच बनवली होती,' अशा शब्दात चिदंबरम यांनी केंद्र सरकारला फटकारले.

निवडणुकांनंतर पंतप्रधानांनी देशातल्या नागरिकांना आवाहन केलं होतं की सर्व वादग्रस्त मुद्दे विसरून विकासावर लक्ष केंद्रित करा. आज विकास किंवा अच्छे दिनचं आश्वासन लोकांना विसरायला लावलं आहे, असंही चिदंबरम म्हणाले.


SHARE THIS

Author:

Previous Post
Next Post