बंगालच्या उपसागरात या हंगामातील तिसरे चक्रीवादळ तयार झाले आहे. याला मिचँग असे नाव देण्यात आले आहे. या चक्रीवादळामुळे देशातील दक्षिणेकडील राज्यांमध्ये मुसळधार स्वरूपाचा पाऊस सुरू आहे.
चक्रीवादळाच्या प्रभावाखाली देशातील तामिळनाडू आणि आंध्र प्रदेश मध्ये आगामी काही दिवस मुसळधार पावसाची शक्यता असून गेल्या काही दिवसांपासून या भागात जोरदार पाऊस सुरू आहे. या वादळाच्या प्रभावाखाली महाराष्ट्रात देखील अवकाळी पावसाची शक्यता तयार होत आहे. वास्तविक या चक्रीवादळाचा थेट परिणाम महाराष्ट्रावर होणार नव्हता.
पण हे वादळ हवेतील ओलावा पूर्व विदर्भापर्यंत पोहोचवणार असल्याने आता राज्यातही पावसाचा अंदाज देण्यात आला आहे.
यामुळे, राज्यातील शेतकऱ्यांची चिंता पुन्हा एकदा वाढणार आहे. गेल्या महिन्यात राज्यात अरबी समुद्रा तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे पाऊस झाला होता.
आता बंगालच्या उपसागरात तयार झालेला कमी दाबाचा पट्टा देखील महाराष्ट्रात अवकाळी पावसासाठी पोषक परिस्थिती तयार करत आहे. गेल्या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात राज्यात मुसळधार पाऊस झाला.
या चालू महिन्यात मात्र पावसाचा जोर थोडासा कमी झाला आहे. परंतु अजूनही अवकाळी पावसाचे राज्यावर सावट आहे. आता सहा आणि सात डिसेंबरला राज्यातील काही भागांमध्ये अवकाळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या चक्रीवादळामुळे राज्यातील विदर्भ विभागातील जवळपास सर्व जिल्ह्यात अवकाळी पावसासाठी पोषक परिस्थिती तयार होणार आहे.
विदर्भातील जवळपास सर्व जिल्ह्यात अवकाळी पाऊस पडणार असा अंदाज IMD ने दिला आहे. दिनांक ६ व ७ डिसेंबर रोजी तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस होण्याची अधिक शक्यता आहे.
यामुळे राज्यातील शेतकरी बांधवांना आंतरमशागतीची कामे, कृषी रसायनांच्या (कीटकनाशके, बुरशीनाशके इत्यादी) फवारणी ची कामे तसेच उभ्या पिकामध्ये खते देण्याची कामे पुढील २-३ दिवसांसाठी पुढे ढकलावीत असा सल्ला कृषी तज्ञांच्या माध्यमातून जारी करण्यात आला आहे.
मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा ..
https://whatsapp.com/channel/0029VaBH9beFCCoZlPbA3e1M
Showing posts with label ताजी बातमी. Show all posts
Showing posts with label ताजी बातमी. Show all posts
...म्हणून बाप्पांचे मंडपातील आगमन लांबणार
मुंबई :- दरवर्षी १५ ऑगस्टला गणपती मिरवणुकांना थाटामाटात, जल्लोषात सुरुवात होते. यंदा मात्र या मिरवणुका थोड्या उशिराने निघणार आहेत. अनेक गणपती मंडपांना अजूनही परवानगी मिळाली नसल्याने तसेच गणपती कारखान्यांनाही उशिरा परवानगी मिळाल्याने बाप्पांचे मंडपातील आगमन लांबले आहे.
स्वातंत्र्यदिनी म्हणजेच १५ ऑगस्टला सार्वजनिक सुट्टी असल्याने रस्त्यावर वाहनांची फारशी गर्दी नसते. त्यामुळे मोठ्या मंडळांना बाप्पांची मिरवणूक काढणे सोपे जाते. या वर्षी मात्र १५ ऑगस्टला अनेक मोठे गणपती कारखान्यातून बाहेर पडणार नाहीत. काही लहान गणपती मंडपांकडे प्रस्थान करतील. मात्र बाप्पांसाठी अजून मंडप उभारणी झाली नसल्याने बाप्पांची मूर्ती विराजमान करायची कशी, असा प्रश्न गणेशोत्सव मंडळाच्या कार्यकर्त्यांना पडला आहे. शनिवारी बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीच्या विनंतीवरून महापालिका अधिकारी, मेट्रो अधिकारी तसेच वाहतूक विभागाच्या अधिकाऱ्यांनी मेट्रोबाधित मार्गाची पाहणी केली. यावेळी २६ ऑगस्ट आणि त्यानंतरच्या सुट्टीच्या दिवशी गणेश आगमन मिरवणुका निघतील, अशी माहिती समन्वय समितीतर्फे देण्यात आली. यासाठी २२ ते २४ फूट रस्त्यांची गरज भासणार आहे. मेट्रोमुळे एवढ्या रुंदीचे रस्ते उपलब्ध होत आहेत का त्याची पाहणी करून २६ ऑगस्टपासून त्याची तजवीज करण्याचा निर्णय झाला आहे. समन्वय समिती अध्यक्ष अॅड. नरेश दहिबावकर यांनीही आगमन मिरवणुकांना उशीर होणार असल्याचे सांगत, सरकारी परवानगीचाच मुद्दा मांडला.
- उपनगरांतील मेट्रोबाधित रस्त्यांची उद्या पाहणी
Kashmir: चकमकीत १ जवान शहीद; ३ जखमी
श्रीनगर :- श्रीनगर जवळील बटमालू येथे सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू असून या चकमकीत एक जवान शहीद झाला आहे तर पोलीस दलाचे तीन जवान जखमी झाले आहेत. शहीद जवान लष्कराच्या स्पेशल ऑपरेशन ग्रुपमध्ये(एसओजी) कार्यरत असल्याची माहिती मिळते आहे.
डीजीपी एसपी वैद्य यांनी दिलेल्या माहितीनुसार बाटमालू परिसरात काही दहशतवादी लपल्याची माहिती शनिवारी सुरक्षादलांना मिळाली होती. त्यानुसार आज पहाटेच या परिसराला घेरण्यात आलं. दोन्ही बाजूंनी जोरदार गोळीबार सुरू झाला. यामध्येच एक जवान शहीद झाला तर तिघं जखमी झाले. दरम्यान कोणताही दहशतवादी ठार करण्यात सुरक्षा दलांना यश आले की नाही हे मात्र अजून समजू शकलेलं नाही.दहशतवाद्यांचं सर्च ऑपरेशन अजूनही सुरूच असून हे मिशन यशस्वी होईल असा विश्वासही वैद्य यांनी व्यक्त केला आहे.
काही दिवसांपूर्वी बारामुल्लामध्येही अशाच सर्च ऑपरेशनद्वारे ५ दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला होता.
पंकजांना एका तासासाठी CM करा; सेनेचा फडणवीसांवर नेम
मुंबई :- मराठा आरक्षण आणि त्यावरून राज्याच्या मंत्री पंकजा मुंडे यांनी केलेल्या विधानाचा आधार घेत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर तिरकस टीका केली आहे. मराठा आरक्षणाचा निर्णय पंकजा मुंडे घेऊ शकतात आणि असे निर्णय घेण्यात कोणतेही अडथळे नसतील तर पंकजा यांना एका तासासाठी का होईना, पण मुख्यमंत्रिपद बहाल केलं पाहिजे, असंही ठाकरे म्हणाले.
मुख्यमंत्री पहाटे तीन–तीन वाजेपर्यंत जागून काम करतात, असे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील सांगतात. ते खरे असेलही. कारण मराठा क्रांतीने झोप उडवल्यावर जागे राहावेच लागेल आणि पापणी मिटली तर पंकजा मुंडे आरक्षणाच्या फाईलवर सही करतील. म्हणून मुख्यमंत्र्यांनी फाईल कुठे आहे हे शोधून आता तरी फायलीचा लाल दोरा सोडावा, असा टोला ठाकरे यांनी 'सामना'च्या अग्रलेखातून मुख्यमंत्र्यांना लगावला.
- ठळक मुद्दे
- पंकजा मुंडे यांनी शिवरायांची शपथ घेऊन सांगितले आहे की, 'मराठा आरक्षणाच्या संदर्भातील फाईल माझ्याकडे असती तर मी क्षणाचाही विलंब न लावता आरक्षण दिले असते.’ याचा दुसरा अर्थ असा घेता येईल की, मराठा आरक्षणासंदर्भात फाईल मोकळी करायला सरकारात चालढकल केली जात आहे. मुख्यमंत्री फडणवीस या प्रश्नी एकाकी पडले आहेत काय?
- पंकजा मुंडे यांना जमू शकते ते फडणवीस यांना का जमू नये? असाही प्रश्न आंदोलकांना आता पडला असेल.
- पंकजा मुंडेंची भूमिका समजून घेतली पाहिजे. त्या जे बोलत आहेत त्यात राजकारण आहे असे कुणाला वाटत असेल तर ते चुकीचे आहे.
- मराठा समाजास आरक्षण मिळावे यासाठी मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापर्यंत जाईन, असे पंकजांनी सांगितले. मग त्यांच्याप्रमाणे मुख्यमंत्री फडणवीस हे दिल्लीत जाऊन, पंतप्रधानांना भेटून मराठा आरक्षणाचा तिढा का सोडवीत नाहीत?
- पंतप्रधान मोदी हे बऱ्याचदा दिल्लीत नसतात व राज्यांतील, देशातील प्रश्नांत त्यांना फारसा रस उरलेला नाही. आंदोलने चिरडून टाकायची हे सरकारी धोरण आहे.
- गुजरातमध्ये पटेल समाजाचे आरक्षण आंदोलन असेच मोडून काढले. जे गुजरातमध्ये झाले नाही ते महाराष्ट्रात होईल काय, हा प्रश्नच आहे.
- हार्दिक पटेलवर देशद्रोहासारखे गंभीर गुन्हे लावून भाजप सरकारने त्याला तुरुंगात डांबले. महाराष्ट्रात मात्र अवघा मराठा समाजच या आंदोलनाचे नेतृत्व करीत आहे. त्यामुळे इथे सरकारची फजिती झाली.
- बरे, हा प्रश्न सोडवण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी दिल्लीत जावे, तर पंतप्रधान बऱ्याचदा परदेशात असतात. त्यामुळे दिल्लीत जाऊन कोणत्या भिंतीवर डोके फोडायचे, असा प्रश्न कदाचित मुख्यमंत्र्यांना पडला असेल.
- सत्तेवर येण्यासाठी जी अफाट वचने व आश्वासने दिली जातात तीच पुढे त्रासदायक ठरतात. धनगर समाजाला, मराठा समाजाला आश्वासन दिले ते आता पूर्ण करावे लागेल. नाही तर आरक्षणाची फाईल पंकजा मुंडे यांच्या टेबलावर पाठवून विषयास पूर्णविराम द्या.
चीन, इराण आणि सौदी पाकचे खास मित्रः इम्रान
इस्लामाबाद :- पाकिस्तानच्या निवडणुकीत मोठा विजय मिळाल्यानंतर 'पाकिस्तान तहरिक-ए-इन्साफ'चे प्रमुख इम्रान खान यांनी परराष्ट्र धोरणाविषयी आपलं मत व्यक्त करायला सुरुवात केली आहे. भारतासोबत चांगले संबंध असायला हवे असे, इम्रान यांनी म्हटलं असलं तरी चीन, इराण आणि सौदी अरब हे पाकिस्तानचे 'खास' मित्र असणार आहेत, असे स्पष्ट संकेत त्यांनी एका पत्रकार परिषदेत दिले.
पाकिस्तानमधील नवनिर्वाचित सरकार हे चीन, सौदी अरब आणि इराण या देशांसोबतचे संबंध अधिक मजबूत करण्यासाठी प्रयत्नशील राहील. पाकिस्तानला सध्या इतर देशांच्या तुलनेत सर्वात जास्त शांततेची गरज आहे. देशात शांतता नांदावी यासाठी पाकिस्तानला अमेरिकेची गरज नाही. अमेरिकेसोबतच्या चांगल्या संबंधासाठी पाकिस्तानला आशा आहे. परंतु, हे एकतर्फी नको, दोन्ही बाजुंनी व्हायला हवे, असे ते म्हणाले.
भारतासोबतच्या संबंधाबद्दल बोलताना ते म्हणाले, पाकिस्तानात काहीही चुकीचे झाले तर त्यासाठी भारत जबाबदार आहे. याप्रमाणे हा आरोप भारत पाकिस्तानवर करतोय. या ब्लेम गेममध्ये कोणालाच फायदा मिळणार नाही. दोन्ही देशांतील चांगल्या संबंधासाठी हा मार्ग योग्य नाही. त्यासाठी दोन्ही देशांनी प्रयत्न करायला हवेत. चीनसोबत असलेले संबंध अधिक दृढ करण्यात येतील. गरीबी आणि भ्रष्टाचाराविरोधात कसे लढायचे हे आम्ही चीनकडून शिकू, असंही ते एका प्रश्नाला उत्तर देताना म्हणाले. सौदी अरब हा अडचणीच्या वेळी मदत करणारा पाकिस्तानचा खरा मित्र आहे, अशा शब्दात इम्रान खान यांनी सऊदीसोबतचे संबंध अधिक दृढ राहणार असल्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत.
Subscribe to:
Posts (Atom)