इकबाल मुल्ला
लोहारा/प्रतिनिधी:- लोहारा लहुजी शक्ती सेना यांच्यावतीने शहरातील शिवाजी चौकात दि.1 मार्च रोजी फकीरा अर्पण दिन साजरा करण्यात आला.यावेळी डॉ.बाबासाहेब आंबेडकर व आण्णा भाऊ साठे यांच्या प्रतिमेचे व फकिरा कादंबरीचे पुजन भागवत वाघमारे यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी पत्रकार निळकंठ कांबळे, श्रीकांत कांबळे,डिगंबर कांबळे,उमाकांत सगट,बाळू सातपुते,कार्तिक कांबळे,रवी पवार, पत्रकार बालाजी बिराजदार,रोडगे दीपक,पत्रकार इक्बाल मुल्ला, प्रा,राजपाल वाघमारे, अतुल कांबळे, अमोल माटे, लक्ष्मण सगट,अभिजित सगट,शाम रोडगे,अक्षय सगट,सचिन रोडगे,बालाजी कसबे, अजय कसबे,बाळू रोडगे,विष्णू मिसाळ,यांच्यासह नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
