• 3 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका
• नामनिर्देशन पत्र 5 फेब्रुवारी ते 10 फेब्रुवारी दरम्यान दाखल होणार
• 25 फेब्रुवारी 2018 रोजी मतदान
बुलडाणा, दि. 24 : राज्य निवडणूक आयोगाने घोषीत केलेल्या निवडणूक कार्यक्रमानुसार जिल्ह्यातील तेराही तालुक्यांमधील माहे मार्च ते मे 2018 या कालावधीत मुदत संपणाऱ्या 3 ग्रामपंचायतींचा सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. तसेच तेराही तालुक्यांमधील रिक्त पदांच्या 106 ग्रामपंचायतींच्या पोट निवडणूकीचा कार्यक्रमही जाहीर करण्यात आला आहे. जिल्ह्यातील 50 टक्क्यांपेक्षा कमी ग्रामपंचायतीच्या निवडणूका असल्यामुळे आचारसंहीता संपूर्ण जिल्ह्यात लागू राहणार नाही. परंतु ज्या तालुक्यात 50 टक्के किंवा त्यापेक्षा अधिक ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुका आहेत. त्या संपूर्ण तालुक्यात आचार संहीता लागू राहणार आहे. निवडणूका असलेल्या ग्रामपंचायतीच्या सिमेलगतच्या गावांमध्येसुद्धा आचारसंहीता लागू राहणार आहे. आदर्श आचार संहीता जरी संपूर्ण जिल्हा/तालुका लगतच्या गावामध्ये लागू असेल तरी जेथे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या क्षेत्रामध्ये नसतील त्याठिकाणी विकासाच्या कामांवर कसलाही निर्बंध राहणार नाही. मात्र याच क्षेत्रात अशी कोणतीही कृती करता येणार नाही. ज्यामुळे निवडणूका होणाऱ्या ग्रामपंचायतीच्या मतदारांवर विपरीत परिणाम पडेल. सदर आचारसंहीता निवडणूक निकाल जाहीर होईपर्यंत अस्तित्वात राहील.निवडणूकीची अधिसूचना 25 जानेवारी 2018 रोजी संबधित तहसिल कार्यालय व ग्रामपंचायत कार्यालयाच्या सूचना फलकावर प्रसिद्ध करण्यात येईल. या कार्यक्रमानुसार सार्वत्रिक निवडुणीकरीता नामनिर्देशनपत्र 5 फेब्रुवारी ते 10 फेब्रुवारी 2018 पर्यंत सकाळी 11 वाजेपासून ते दुपारी 4.30 वाजेदरम्यान स्वीकारले जाणार आहे. या निवडणूकीचे मतदान 25 फेब्रुवारी 2018 रोजी सकाळी 7.30 ते सायं 5.30 वाजेपर्यंत होणार असून मतमोजणी 26 फेब्रुवारी 2018 रोजी करण्यात येणार आहे, असे जिल्हाधिकारी यांनी कळविले आहे.
SHARE THIS