इकबाल मुल्ला
लोहारा :- शहरातील देवगिरी ग्लोबल अकॅडमी मध्ये विज्ञान दिवस साजरी करण्यात आला.
यावेळी चंद्रशेखर वेंकट रमण यांचे प्रतिमे चे पूजन करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली.या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी अकॅडमी चे प्राचार्य विवेकानंद जे.पाटिल होते.यावेळी विध्यार्थ्यांनी विज्ञान दिवस या विषयां वर भाषण केले.या नंतर अमित बोराळे सर आणि शकुंतला बिराजदार यांनी विज्ञान दिवस वर विध्यार्थ्यांना सविस्तर माहिती दिली. या कार्यक्रमात अकॅडमीतील शिक्षक अमित बोराळे, जयेश पुकाळे,भाग्यश्री सुरवसे,जहेरा बागवान, अनुराधा कोळी,वनिता विरुदे,शकुंतला बिराजदार यांनी सहभाग घेतला.या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन भाग्यश्री सुरवसे यांनी केले तर जहेराबी बागवान यांनी आभार मानले.या कार्यक्रमास शिक्षक वर्ग,शिक्षकेत्तर कर्मचारी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
